आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लिल चाळे करणाऱ्या दाेघा जोडप्यांवर कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव  - सार्वजनिक ठिकाणी अंधाराचा फायदा घेत अंगलट करणाऱ्या दोन जोडप्यांवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर करून दंडात्मक कारवाई झाली आहे. 

 

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाने रविवारी रात्री ८ वाजता सागर पार्क परिसरात गस्त केली. या वेळी अंधाराचा फायदा घेत तरुण-तरुणींचे दोन जोडपे अंगलट करीत असताना आढळून आले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर सोमवारी चौघांना न्यायालयात हजर केले असता दंडात्मक कारवाई झाली आहे. सागर पार्क, मू.जे. महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या रोडरोमिअाेंसाठी हा कारवाईचा इशारा ठरला आहे. तीन दिवसांपूर्वी लॉ कॉलेज परिसरात अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती. या वेळी काही तरुण दुचाकी सोडून पळून गेले होते. या दुचाकी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. शहरात इतर सार्वजनिक जागेवर अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे पोलिस दलातर्फे कळवण्यात आले आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी विक्षिप्त कृत्य करण्याचे प्रकार वाढल्याने या कारवाईत सातत्य राखायला हवे. 
 

बातम्या आणखी आहेत...