आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जालना - बनावट गुटखा प्रकरणातील आरोपी असलेल्या शहरातील उद्योजक केतन शहा याच्या मालमत्तेवर एसबीआयने ताबा घेण्याची कारवाई सुरू केली आहे. बँकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहाकडे २३ कोटी ९ लाख ४४ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकेने ३१ मार्च २०१५ रोजी मागणीची नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतरही या रकमेचा भरणा करण्यात आला नसल्याने सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
बँकेच्या वतीने काही दिवसांपूर्वी त्याची नाथनगर येथील एका मालमत्तेचा ताबा घेण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी शहरातील जिजाऊ प्रवेशद्वार येथील प्रस्तावित शॉपिंग मॉलच्या प्लॉटचा ताबा घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामाच्या ठिकाणी एक बॅनरही लावले अाहे. या मालमत्तेवर बँकेचा ताबा असल्याचे त्यात म्हटले आहे. शिवाय बँकेच्या परवानगीशिवाय यासंदर्भात व्यवहार करू नये, असा इशारा देण्यात
आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केतन शहा यांनी उद्योग सुरू करण्यासाठी एसबीआयकडून कर्ज घेतले होते. मात्र बँकेने वेळोवेळी मागणी करूनही त्याचा भरणा न करण्यात आल्याने हे खाते एनपीए मध्ये गेले होते. त्यानुसार दोन वर्षांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आल्याचे बँकेचे वकील अॅड.महेश धन्नावत यांनी दिव्य मराठी शी बोलताना सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.