आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलस्रोतापासून ५०० मीटरच्या आत विहीर, बोअर खोदणाऱ्यांवर कारवाई - पाणीपुरवठामंत्र्यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पिण्याच्या पाण्याच्या उद्भवापासून ५०० मीटरच्या आत काही जण खासगी विहीर किंवा कूपनलिका खोदत आहेत. वास्तवात असे करण्यास बंदी आहे. तरीही असा प्रकार केलेल्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत सांगितले. गणपतराव देशमुख यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात लोणीकर बोलत होते. 


अतिशोषित पाणलोट क्षेत्रांमध्ये २०० फुटांहून अधिक खोलीची कूपनलिका घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आला आहे. विदर्भातील घटलेली भूजलाची पातळी लक्षात घेऊन हायड्रो फ्रॅक्चरिंग तंत्रज्ञानावर अधिक लक्ष देण्यात येईल. दरम्यान, अमृत योजनेत समाविष्ट केलेल्या ४४ शहरांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी देण्याचे धोरण आहे. ग्रामीण भागामध्ये सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापनाद्वारे प्रदूषणाला आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते एका उपप्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. 


नळ पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर : मुख्यमंत्री पेयजल योजनेतील पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर करण्याबाबत राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला असून राष्ट्रीय पेयजल योजना, भारत निर्माण योजना, जिल्हा परिषद आदींच्या नळ पाणीपुरवठा योजनाही सौरऊर्जेवर करण्याबाबत विचार सुरू असल्याचे येईल लोणीकरांनी सांगितले. दिवसा सौरऊर्जेवर तर रात्री महावितरणच्या विजेवर चालवण्याचा पर्याय अवलंबण्यात येईल. सौरपंप बसवल्यानंतर या संयंत्रांची ५ वर्षांची दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर टाकण्यात येईल. तसेच सौर पॅनलसाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...