आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉनसन अॅण्ड जॉनसन कंपनीला 230 कोटी रूपयांचा ठोठावला दंड, जीएसटी कर कपातीचा ग्राहकांना लाभ न दिल्याचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 नोव्हेंबर 2017 मध्ये काही वस्तूंवरील जीएसटी दर 28% हून 18% झाला होता
  • नॅशनल अॅण्टी प्रॉफिटियरिंग अथॉरिटीने तीन महिन्यात रक्कम जमा करण्याचे दिले आहेश
  • जॉन्सन आणि जॉन्सनचा भारताच्या बेबी केअर मार्केटमध्ये 75% वाटा

नवी दिल्ली - नॅशनल अॅण्टी प्रॉफिटियरिंग अथॉरिटी (एनएए)ने जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीला 230.41 कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. अथॉरिटीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने टॅक्सच्या कपातीनंतर आपल्या उत्पादनांच्या किमतीचे चुकीचे मूल्यांकन केले. 15 नोव्हेंबर 2017 रोजी काही वस्तूंवरील जीएसटी दर 28% वरून 18% करण्यात आला, परंतु कंपनीने ग्राहकांना याचा लाभ दिला नसल्याचे या तपासणीत आढळून आले. याप्रकरणी सोमवारी जारी केलेला एनएएचा आदेश बुधवारी उघडकीस आला.करकपातीनंतर किंमती निश्चित करण्यासाठी कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत : कंपनी


जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला तीन महिन्यात दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, अशाप्रकरणात कोणत्याही प्रकारची गाइडलाइन्स नसल्यामुळे त्यांनी आपल्या हिशोबाचे आकलन केले होते. एनएएने कंपनीकडून मिळालेली माहिती आणि आकडेवारी अपूर्ण सांगत सर्व दावे फेटाळले. कंपनीला 2017-18 मध्ये भारतातून 5825 कोटींचा महसूल मिळाला


जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनी भारतात  ग्राहक आरोग्य सेवा, वैद्यकीय उपकरणे आणि फार्मा उत्पादनांचा व्यवसाय करत आहेत. कंपनीचे बेबी ऑईल, क्रीम, पावडर आणि सॅनिटरी नॅपकीन (स्टेफ्री)सारखे उत्पादने वापरले जातात. कंपनीसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. देशातील चार हजार कोटी रुपयांच्या बेबी केअर मार्केटमध्ये 2018च्या अखेरपर्यंत कंपनीचा 75% हिस्सा असण्याचा अंदाज आहे. कंपनीची भारतातील कमाई 5,828 कोटी रुपये होती आणि आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नफा 688 कोटी होता.

बातम्या आणखी आहेत...