आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या प्रचार वाहनांवर आरटीओने केली कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नगर - भाजपकडून विनापरवाना वाहनांद्वारे शहरात महापालिका निवडणुकीचा प्रचार केला जात असल्याची तक्रार आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपची ५ वाहने चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली. या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. 

 

महापालिका निवडणुकीसाठी वापरले जाणारे प्रचार साहित्य, वाहनांचे परवाने घेण्याचे बंधन आहे. त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्षही अतिक्रमण विभागात थाटण्यात आला आहे. निवडणूक विभागाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश निवडणूक विभागाने जिल्हा प्रशासनासह संबंधित विभागांना दिले आहेत. 


राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी नुकताच कामकाजाचा आढावा घेऊन नियमांची काटेकोर अंमलबावणी करण्याचे आदेश दिले होते. काही वाहनांवर फलक व ध्वनिक्षेपक लावून विनापरवाना प्रचार केला जात असल्याची तक्रार शिवसेनेचे गिरीश जाधव व राजेंद्र दळवी यांनी केली होती. ही वाहने दिल्लीगेट परिसरात असल्याची माहितीही दिली यात तक्रारीवरून आरटीओ पाटील यांनी स्वत: पथकासमवेत जाऊन १ डिजिटल प्रचार वाहन व अन्य ४ वाहने ताब्यात घेतली. ही वाहने आरटीओ कार्यालयात उभी करण्यात आली आहेत. सर्व कागदपत्रांची तपासणी करून परवानग्या घेण्यात आल्या असतील तर वाहने सोडली जातील. अन्यथा पुढील कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...