आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचलमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशमध्ये एक आमदार आणि इतर १० जणांची हत्या करणाऱ्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दिली. रिजिजू यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, पूर्व अरुणाचल प्रदेशमध्ये मोठी लष्करी कारवाई करण्यात येत आहेे. मात्र, जोपर्यंत स्थानिक लोक सहकार्य करत नाहीत तोपर्यंत लष्करी कारवाई हा कायमस्वरूपी तोडगा ठरू शकत नाही. जेव्हा स्थानिक समुदायांतील काही सदस्य दहशतवादी कारवायांत सहभागी असतात आणि त्यांचा दहशतवादी समुदायांशी संबंध असतो तेव्हा सुरक्षा दलांची कारवाई एकांगी ठरते. काही लोक फक्त प्रश्न विचारतात आणि सुरक्षा दलांना दोष देतात. पण ते कधीही दहशतवादी कारवायांचा निषेध करत नाहीत. काही लोक सशस्त्र दले (विशेष अधिकार) कायद्याच्या (एएफएसपीए) विरोधात बोलतात. हा कायदा नागरिकांना चांगली सुरक्षा पुरवण्यासाठीच आणला होता. १९९७-९८ पासून राजकीय नेते आणि इतर महत्त्वाचे लोकही जबाबदार आहेत, कारण ते दबावाला बळी पडतात आणि काही वेळा दहशतवाद्यांची मदत घेतात. आता प्रत्येकाने कठोर भूमिका घेण्याची, सर्वांनी एकत्र येण्याची आणि हिंसाचार आणि दहशतवादी गटांना नाही म्हणण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या प्रश्नावर मात करू.


एनएससीएनच्या दहशतवाद्यांनी मंगळवारी विद्यमान आमदार आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) उमेदवार तिरोंग अबोह यांच्यासह ११ जणांची तिरप जिल्ह्यात हत्या केली होती. या निर्घृण हत्याकांडामुळे आपल्याला धक्का बसला आहे, असे सांगताना रिजिजू यांनी म्हटले आहे की, काही वर्षांपासून संपूर्ण अरुणाचल प्रदेशमधील परिस्थितीत सुधारणा झाली आहे, पण या निवडणुकीत तिरप जिल्ह्यात झालेल्या दोन घटनांमुळे वातावरण बिघडले आहे. 

 

गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळेल : एस. बी. के. सिंह
राज्याचे पोलिस महासंचालक एस. बी. के. सिंह यांनी सांगितले की, हत्याकांडातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी लष्कराने मोठी मोहीम हाती घेतली आहे. गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिरप आणि शेजारील चांगलांग जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी कारवाईत सहभागी झालेल्या विविध सुरक्षा संस्थांशी समन्वय साधण्यासाठी आणि कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी खोंसा येथे दाखल झाले.