आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Action Will Be Continued On The Boundary To Teach A Lesson To Pak Sasy Defense Minister

पाकला धडा शिकवण्यासाठी सीमेवर कारवाई सुरूच राहील, संरक्षणमंत्र्यांचा कडक इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - सर्जिकल स्ट्राइकच्या कारवाईला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भारताने पाकिस्तानला इशारा दिला आहे. सर्जिकल स्ट्राइक हे भारताने पाकिस्तानला दिलेले चोख उत्तर होते. पाकिस्तानने त्यातून काही धडा घेतला असेल किंवा नसेल, पण सीमेवरील भारताची लष्करी कारवाई सुरूच राहील, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले.

 

संरक्षण मंत्र्यांनी शुक्रवारीदेखील जोधपूरमध्ये कमांडर्स कॉन्फरन्समध्येही पाकिस्तानला इशारा दिला होता. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते, भारताने सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच पाकिस्तानवर अलीकडेच एक मोठी कारवाई केली. रफाल करारावर विरोधी पक्षाला त्यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, या प्रश्नाचे उत्तर मी चार वेळा दिल्याची माहिती संसदेत देणार आहे. मी लिखितही उत्तर दिले आहे. वास्तव तेच आहे. पण तुम्ही हे उत्तर स्वीकारणार आहात का ? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. रशियाकडून शस्त्र खरेदीसंबंधी अमेरिकेच्या भूमिकेत होत असलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, ४०० एअर डिफेन्स सिस्टिमवर प्रदीर्घ काळापासून रशियाशी चर्चा सुरू आहे. आता ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रशियाकडून शस्त्र खरेदी ही आमची परंपरा राहिल्याचे सांगून त्यांनी या कराराबद्दलची कटिबद्धता बोलून दाखवली.  

 

‘मसूदला अतिरेकी घोषित करण्यावर सहमती नाही’ 

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अजहरला संयुक्त राष्ट्राद्वारे जागतिक दहशतवादी जाहीर करण्याच्या भारताच्या प्रयत्नात चीनने पुन्हा अडसर निर्माण केला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी अमेरिकी थिंक टँक काैन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सच्या एका कार्यक्रमात म्हणाले, सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्यास आम्ही यामुद्याचे समर्थन करतो. परंतु या मुद्द्यावर संबंधित सर्वांत सहमती व्हायला हवी. पण भारत व पाकिस्तान त्यावर सहमत नाही.  

 

बीएसएफचे महासंचालक म्हणाले, सूड घेतला..

बीएसएफचे महासंचालक के.के. शर्मा म्हणाले, आपले सैनिक (नरेंद्र शर्मा) यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आम्ही नियंत्रण रेषेवर पुरेशी कारवाई केली. आम्हाला योग्य वेळी व पसंतीच्या ठिकाणी उत्तर देण्याचा अधिकार आहे. आम्ही पुन्हा हेच करू, असा इशारा त्यांनी दिला.  गेल्या काही दिवसांपासून सीमेवर कारवाया सुरू आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...