आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'काॅप' अॅपवरून तातडीने होईल कारवाई; तक्रारदाराचे नावही ठेवले जाईल गोपनीय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायच्या दुसऱ्या दिवशी प्रशासन मात्र 'काॅप'च्या अॅपभाेवती फिरत हाेते. अाचारसंहिता भंग झाल्यास त्याची माहिती थेट देता येईल. तसेच तक्रारही थेट दाखल करता येणार अाहे. या प्रक्रियेत नागरिकांचे नाव मात्र गाेपनीय ठेवले जाणार अाहे. पाेलिस व अधिकाऱ्यांकडे ही तक्रार गेल्यावर त्यावर तातडीने कारवाई हाेईल. त्यासाठी हे अॅप कसे वापरावे, याचा कित्ता अधिकाऱ्यांना दिवसभर गिरवावा लागला. यात प्रथम अधिकाऱ्यांना समजावण्यात अाले. त्यानंतर दुपारच्या टप्प्यात राजकीय प्रतिनिधींनाही 'काॅप'च्या अॅपची माहिती देण्यात अाली.


महापालिकेच्या सभागृहात बुधवारी निवडणूक आयोगातर्फे विविध माहितीची प्रशिक्षणे झाली. महापालिकेतर्फे 'कॉप' अॅप्लिकेशन अॅपची माहिती प्रथम निवडणूक अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात अाली. निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी अतुल जाधव यांनी अॅप काय अाहे, हे सविस्तर सांगितले. 'कॉप' या अॅपची स्क्रीनवरही माहिती दिली. कॉप अॅप गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येते. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग झाला. अथवा मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा, पैसे, भेटवस्तू, सवलतीचे कुपन देण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याची या अॅपवर थेट तक्रार करता येणार अाहे.

 

नागरिक अशी तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडे करू शकतात. मात्र नागरिक नाव उघड हाेईल, या भीतीने पुढे येत नाही. याकरिता आता तक्रार करणाऱ्याचे नाव कॉप अॅपच्या माध्यमातून गोपनीय राहणार आहे. या अॅपमध्ये शहरातील पोलिस ठाण्यांची हद्द मॅपंिग करण्यात आली आहे. मोबाइलवर छायाचित्र टाकल्यावर त्यासंबधी माहितीही टाइप करता येणार आहे. ही माहिती मिळताच पोलिस व निवडणूक अधिकारी तत्काळ तेथे जाऊन खात्री करून कारवाई करतील. यात नागरिकांचे नाव व ओळख गोपनीय राहील. यामुळे निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसेल. निवडणूक पारदर्शी हाेईल. तक्रारीचे निरसन झाल्यावर तक्रारदारांना तसा संदेश त्यांच्या मोबाइलवर मिळेल.

 

याकरिता कॉप हे अॅप फायदेशीर राहणार असल्याने ते मोबाइलवर डाऊनलोड करावे असे अावाहन केले. या वेळी निवडणूक अायाेगाचे सहायक शैलेंद्र वराडे, तज्ज्ञ मार्गदर्शक समीर पवार, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रवींद्र जाधव उपस्थित होते.पहिल्यांदा अधिकाऱ्यांना नंतर राजकीय प्रतिनिधींनाही समजवली प्रक्रिया...कॉपच्या अॅपची माहिती पोलिस तसेच अधिकाऱ्यांना समजावून देताना निवडणूक आयोगाचे जाधव व देशमुख.

 

छायाचित्रासह पाठवा...
कॉप अॅप डाऊनलोड केल्यावर तेथे कॅमेऱ्याचे ऑप्शन आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रण, छायाचित्र काढून ते अपलोड होईल. त्या वेळी त्याखाली तेथील ठिकाण, वेळ येणार आहे. ज्या भागातील हे छायाचित्र असेल त्या हद्दीतील पोलिस ठाणे, पोलिस अधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना ते त्यांच्या मोबाइलवर मिळेल. त्यानंतर तातडीने धाव घेऊन कारवाई केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...