आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित विचारवंत तेलतुंबडेंना झालेली अटक बेकायदेशीर, त्वरीत सोडण्याचे कोर्टाचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दलित विचारवंत आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सोबतच त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. मुंबईत छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांची पुण्यात रवानगीही करण्यात आली. भिमा कोरेगाव दंगल प्रकरणातील माओवाद्यांशी त्यांचे कथित संपर्क होते असा आरोप लावण्यात आला.

 

तेलतुंबडे गोवा इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिकवतात. त्यांनी यापूर्वी पुण्यातील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सुद्धा केला होता. परंतु, तो नकारण्यात आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन नकारला होता. तसेच तेलतुंबडेंचे एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचे मुबलक पुरावे असल्याचे सांगितले होते. याच माओवाद्यांमुळे आणि एल्गार परिषदेने भिमा कोरेगावची दंगल भडकावली होती असा आरोप आहे.

 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वदाने यांनी हे निरीक्षण नोंदवले होते. दरम्यान, आनंद तेलतुंबडे यांनी सांगितल्याप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत ही अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले. त्यांना 11 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून स्वातंत्र्य दिले होते. तेलतुंबडे यांचे वकील रोहन नाहर यांनी सुप्रीम कोर्टाच्या 11 जानेवारीच्या निकालाचा दाखला दिला होता.

बातम्या आणखी आहेत...