आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये दिसू शकतो आमिर, 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'नंतर सुरु होणार शूटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'नंतर आमिर खान कोणता चित्रपट सुरु करणार याविषयी आता इंडस्ट्रीमध्ये अंदाज लावले जात आहेत. पहिले बोलले जात होते की, आमिर 'महाभारत' सुरु करणार आहे. सध्या तो महाभारत वाचतोय. नंतर वृत्त होते की, आमिर 'कपूर अँड सन्स' फेम डायरेक्टर शकुन बत्राचा पुढच्या चित्रपटात आचार्य रजनीश(ओशो)ची भूमिका साकारणार आहे. आता बोलले जातेय की, आमिर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' नंतर एका हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये दिसणार आहे.

 

ओशो यांचा बायोपिक होल्ड - सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'आमिर खानने शकुन बत्राच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा चित्रपट होल्ड केला आहे. आमिरच्या सल्ल्यानुसार या चित्रपटाची स्क्रिप्ट पुन्हा लिहिली जातेय. आमिरला स्टोरीचा काही भाग पसंत पडला नव्हता.' - सुत्रांनी पुढे सांगितले की, आमिर एका हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये इंस्ट्रेस्टेड आहे. हा चित्रपट पॅरामाउंट पिक्चर्स व्दारे प्रोड्यूस केला गेला होता. - जोपर्यंत काही फायनल होत नाही, तोपर्यंत आमिर त्याच्या प्रोजेक्टविषयी बोलत नाही. यामुळे या चित्रपटाचे नाव अजून समोर आलेले नाही. जेव्हा सर्व काही फायनल होईल तेव्हा या चित्रपटाचे नाव समोर येईल. सध्या आमिरची टीम चित्रपटाचे अधिकार घेण्याविषयी बोलत आहे.

बातम्या आणखी आहेत...