आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Aamir Khan's Support To Prime Minister's Campaign Against Single use Plastics, Amir Said, 'This Is Our Responsibility'

सिंगल यूज प्लास्टिकविरुद्ध पंतप्रधानांच्या अभियानाला अभिनेता आमिर खानचा सपोर्ट, म्हणाला - 'ही आपली जबाबदारी' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर दिलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्त करण्याची अपील केली होती. त्यांनी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून हे अभियान सुरु करण्याचे आवाहन केले होते. आता या मुद्द्यावर सुपरस्टार आमिर खानने पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे, जे व्हायरल होत आहे.   
 

आमिरने लिहिले - ही आपली जबादारी आहे... 
आमिर खानने ट्वीटमध्ये लिहिले, "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगल यूज प्लास्टिकला बंद करण्याच्या प्रयत्नांचे आपण समर्थन केले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे की, आपण सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करावा." मात्र या ट्वीटवर अनेक लोक आमिरला ट्रोल करत त्याच्यावर काश्मीर मुद्द्यावर बोलण्याविषयी दबाव टाकत आहेत.  
 

'लाल सिंह चड्ढा' चित्रपटावर काम करत आहे आमिर... 
आमिर सध्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटावर काम करत आहे. हा 6 ऑस्कर अवॉर्ड विनर हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' (1994) चा ऑफिशिअल हिंदी रीमेक आहे. अद्वैत चंदनच्या दिगदर्शनात बनत असलेला 'लाल सिंह चड्ढा' पुढच्यावर्षी रिलीज होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...