Home | Gossip | Actor Aastha Chaudhary of 'Kesari Nandan' said, 'i was dropped out from two shows because of my dark skin color'

सिरीयल 'केसरी नंदन'ची अभिनेत्री आस्था चौधरी म्हणाली - 'सावळ्या रंगामुळे दोन शोमधून मला काढले गेले होते'

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 10, 2019, 06:03 PM IST

टीव्हीवर केवळ सुरुवात वेगळ्या कॉन्सेप्टने होते... 

 • Actor Aastha Chaudhary of 'Kesari Nandan' said, 'i was dropped out from two shows because of my dark skin color'

  टीव्ही डेस्क : सध्या सीरियल 'केसरी नंदन'मध्ये माधवीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री आस्था चौधरीनुसार ती रंगभेदाची शिकार झाली आहे. दैनिक भास्करसोबत बातचीत करताना तिने सांगितले की, दोन शोच्या मेकर्सने तिला तिच्या सावळ्या रंगामुळे रिजेक्ट केले होते. आस्थाने इंटरव्यूमध्ये टीव्हीपासून पाच वर्षे दूर राहण्याचे कारण सांगितले. अभिनेत्रीनुसार, तिला आपल्या आधीच्या दोन शोपेक्षा काहीतरी वेगळे करायचे होते. पण खूप काळ वाट पाहिल्यानंतर तिला कळाले की, टीव्हीमध्ये बदल घडायला आणखी वेळ लागेल.

  सावळ्या रंगामुळे रात्रीतून शोमधून केले गेले बाहेर...
  "एक वेळ अशीही होती, जेव्हा मला माझ्या स्किनच्या रंगामुळे रिजेक्ट केले गेले होते. मला आठवते की, दोन शोसाठी माझी निवड झाली होती, पण नकानंतर प्रोजेक्ट्समधून हे सांगून काढले गेले की, ही पंजाबी मुलीची भूमिका आहे, ज्यामध्ये तुम्ही फिट बसत नाहीत. विश्वास ठेवा हा निर्णय एका रात्रीत केला गेला होता. ज्यामुळे मी हैरान झाले होते. काही दिवसांनी ऐकिवात आले की, माझा रंग सावळा आहे, त्यामुळे मला रिजेक्ट केले गेले. निश्चितच मी थोडी शॉक झाले, पण काय करणार ? हे सत्य आहे."

  टीव्हीवर नवे किंवा वेगळे करण्यासाठी काहीच नाही...
  "मी माझ्या पहिल्या दोन शोमध्ये एक टिपिकल मुलगी आणि सुनेच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर मला तसेच शोज ऑफर झाले, ज्यामध्ये मी खुश नव्हते. अभिनेत्री असल्याच्या नात्याने मला काहीतरी वेगळे करायचे होते. असे नव्हते की, मला कामातून ब्रेक घ्यायचा होता. मला काहीतरी वेगळे करायचे होते, पण काही वर्षांनी मला जाणवले की, टीव्हीवर काहीतरी नवीन किंवा वेगळे करण्यासाठी काहीच नाही. टीव्हीचा आपला एक फॉर्मूला आहे, जो कित्तेक वर्षांपासून चालत आला आहे आणि तो बदलायला खूप वेळ लागेल. मी सत्य स्वीकारले आहे. ब्रेकदरम्यान मला पर्सनल लाइफवरही फोकस करायला वेळ मिळाला."

  टीव्हीवर केवळ सुरुवात वेगळ्या कॉन्सेप्टने होते...
  "टीव्हीमध्ये काहीही वेगळे होत नाही. जर आपण वेगवेगळ्या भूमिकांविषयी बोललो तर शोची सुरुवात एका वेगळ्या कांसेप्टने होते, पण नंतर पुन्हा तेच सगळे होऊ लागते. तुम्ही लग्न करता, घरी येत, आपल्या जबाबदाऱ्या सांभाळता. आता मी कधीच म्हणत नाही की, मला काहीतरी वेगळे करायचे आहे. कारण टीव्हीवर अशाचप्रकारचे शोज बनवले जातात, जे महिलांशी जोडले गेलेले असतात. त्यामुळे काहीही वेगळे दाखवू शकत नाही. एकत्र महिला एक गृहिणी किंवा नोकरदार. जर त्यांचे कुटुंब सामील नाही तर शो बनवला जाऊ शकत नाही. त्यामुळे टीव्हीवर वेगळी भूमिका करणे वास्तवात थोडे कठीण आहे." आस्थाने 'बाबुल का आंगन छूटे ना', 'उतरन', 'वीरा' आणि 'रिश्तों के भंवर में उलझी नियति' अशा सीरियल्समध्ये काम केले आहे. 'केसरी नंदन'मध्ये ती केसरीच्या आईचा रोल करत आहे.

 • Actor Aastha Chaudhary of 'Kesari Nandan' said, 'i was dropped out from two shows because of my dark skin color'
 • Actor Aastha Chaudhary of 'Kesari Nandan' said, 'i was dropped out from two shows because of my dark skin color'

Trending