आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजन नंदा यांच्या प्रेयर मीटमध्ये हसल्यामुळे ट्रोल झाला अभिषेक बच्चन, सोशल मीडियावर होतेय टिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: अभिषेक बच्चन नुकताच बहीण श्वेता नंदाचे सासरे राजन नंदाच्या प्रेअर मीटमध्ये स्पॉट झाला. यावेळी तो हसत बहिणीसोबत बोलत असल्यामुळे त्याला ट्रोल केले जातेय. सोशल मीडिया यूजर्स यामुळे अभिषेकवर भडकले. कारण शोक सभेत तो एवढा आनंदी दिसत होता. अनेक ट्रोलर्सने लिहिले की, ही प्रेअर मीट होती की, पार्टी? यावेळी अनेक अनेक ट्रोलर्स म्हणाले की, सेलेब्स प्रेअर मीटमध्ये फक्त शोबाजी करण्यासाठी येतात. तिथे पांढरे डिझायनर कपडे घालतात आणि पांढ-या फुलांच्या सजावटीमध्ये बसून एन्जॉय करतात. 

 

अमिताभ बच्चनचे व्याही, राज कपूरचे जावई होते राजन नंदा 
- राजन नंदा (76) हे ट्रॅक्टर आणि इतर कृषी उपकरण बनवणा-या एस्कॉर्टस ग्रुपचे चेअरमन होते. रविवारी गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले होते. नुकतेच त्यांनी किडनी ट्रान्सपांट केले होते. 
- राजन नंदा हे बॉलिवूडचे शोमॅन राज कपूरचे जावई होते. राज कपूर यांची मोठी मुलगी ऋतू कपूरचे लग्न 1969 मध्ये राजन नंदा यांच्याशी झाले होते. ऋतू सध्या नंदा इंश्योरेंस सर्विसच्या सीईओ आहेत. राजन नंदा हे अभिनेते ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांचे भाऊजी होते.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...