आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता अली असगर साकारणार आईची भूमिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी टीव्ही आता लवकरच चित्रपटांवर आधारित पहिलाच ‘मूव्ही मस्ती विथ मनीष पॉल’ नावाचा एक हलकाफुलका गेम शो सादर करणार आहे. मिश्कील सूत्रसंचालक मनीष पॉल हा सूत्रधार असलेल्या या कार्यक्रमात त्याचे बॉलीवूडच्या चित्रपटांचे वेड असलेले कुटुंबीय एक धमाल कार्यक्रम सादर करतील. त्यात बॉलीवूडच्या विख्यात कलाकारांना बॉलीवूडशी संबंधित विविध प्रश्न विचारून तसेच काही मजेशीर खेळ खेळायला लावून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आजवर अज्ञात असलेली बाजू पुढे आणली जाईल. या कार्यक्रमाविषयी अली असगर म्हणाला, मी जुन्या, कृष्णधवल जमान्यातील चित्रपटांचा मोठा चाहता आहे.  आता बऱ्याच वर्षांनंतर मला झी टीव्हीबरोबर काम करण्याची संधी मिळाली असून तिचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार आहे. किंबहुना मला ‘मूव्ही मस्ती विथ मनीष पॉल’ या कार्यक्रमाचा फार अभिमान वाटतो. यातील माझी भूमिका अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात मी महिलेच्या गेटअपमध्ये राहणार आहे. या क्षेत्रातील अनेक गुणी कलाकारांबरोबर चित्रीकरण करण्यास मी अधीर झालो आहे.

बातम्या आणखी आहेत...