आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fitness : झिंगाट पळताना दिसले 61 वर्षीय अनिल कपूर, एकेकाळी चालतानाही व्हायचा त्रास, म्हणाले- ही माझ्यासाठी एक मोठी अचिव्हमेंट आहे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिनेता अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते जोरात धावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ स्वतः अनिल कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करुन त्यांनी लिहिले, एक काळ असा होता, जेव्हा मला चालणेही कठीण झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पायांना दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून बरे होण्यासाठी बराच काळ लागला. पण आता मी अगदी फिट असून हे माझ्यासाठी यश आणि विजयापेक्षा कमी नाही.

 

जानेवारी, 2017 मध्ये 'मुबारकां' या चित्रपटाच्या सेटवर अनिल कपूर यांच्या पायांना दुखापत झाली होती. तेव्हा अनिल कपूर यांनी जुने दुखणेच पुन्हा वर आले असल्याचे म्हटले होते. 'मुबारकां' चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सिक्वेन्स आणि डान्स करताना त्या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले. या दुखण्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एक महिना विश्रांतीचा सल्ला दिला होता.

 

जिममध्ये घाम गाळताना दिसले होते अनिल कपूर...
या व्हिडिओपूर्वी अनिल कपूर यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करुन त्यांनी लिहिले होते, "हार्ड वर्कआउटला दुसरा काहीच पर्याय नसतो."  अनिल कपूर 61 वर्षांचे असून ते स्वतःला अगदी फिट ठेवतात. यामध्ये त्यांच्या डेली रुटीनचा मोठा वाटा आहे. 

 

लेटनाइट पार्टी करत नाही...
एका मुलाखतीत अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूरने सांगितले होते की, तिचे वडील रात्री 11 वाजता झोपतात. त्यामुळे बॉलिवूडमध्ये चालणा-या लेट नाइट पार्टीत ते कधीच दिसत नाहीत. झोपण्या-उठण्याच्या वेळा पाळण्यासोबतच ते स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात. ते साखर आणि जंक फूड खात नाहीत. अनिल कपूर सांगतात की, अधिकाधिक हेल्थ इश्यूज हे शूगरमुळे होतात त्यामुळे तुम्ही जेवढे गोड पदार्थ टाळाल, तेवढी तुमची प्रकृती उत्तम राहिल.

 

दिवसातून 5 ते 6 वेळा जेवतात अनिल कपूर...
अनिल कपूर स्वतःला नशीबवान समजतात. कारण वयाची साठी ओलांडल्यानंतरही ते आजारांपासून दूर आहेत. त्यांच्या डाएटविषयी सांगायचे म्हणजे ते दिवसातून 5 ते 6 वेळा थोडे-थोडे जेवतात. यामध्ये भाज्या, डाळ, ओट्स, मासे, ब्रोकली, चिकन आणि प्रोटीन शेक्सचा समावेश असतो. 

 

2 ते 3 तास वर्कआउट करतात...
अनिल कपूर दररोज 2 ते 3 तास वर्कआउट करतात. ते नियम आणि बॉडी पार्ट्सनुसार वर्कआउटमध्ये बदल करत असतात. प्रत्येक दिवशी ते 10 ते 20 मिनिटे कार्डिओ करतात. त्यानंतर फ्री वेट, पुश-अप्स, क्रंचेस, चेयर स्क्वाट हे टिपिकल वर्कआउट करतात. या वर्कआउटमध्ये ते जलद गतीने सायकलिंगही करताना दिसतात. योग प्रॅक्टिस हा त्यांच्या रुटीनचा भाग आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...