आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेते अनिल कपूर म्हणाले, मी तर दिग्दर्शकाचा अभिनेता

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी : मी स्वत:ला नेहमी दिग्दर्शकाचा अभिनेता म्हणतो, कारण ज्या चित्रपटात मी काम करत असतो त्या चित्रपटात मी कसे काम करावे, अभिनय कसा करावा हे अत्यंत चांगल्या पद्धतीने एक दिग्दर्शकच सांगू शकतो. त्यामुळे आतापर्यंत मी जे अभिनय केले आहेत त्याचे जेवढे श्रेय मला जाते तेवढेच श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकालाही जाते, असे मत अनिल कपूर यांनी इफ्फीत आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केले.

या वेळी अनिस बज्मी आणि अभिनेत्री टिस्का चोप्रा यांची उपस्थिती होती. दिग्दर्शक हा चित्रपटातील प्रमुख व्यक्ती असतो. कारण लिखाण, सराव, शूटिंग यासारख्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येतो, तेव्हा त्याला दिग्दर्शकाचे प्रोडक्ट म्हणून बघितले जाते, असे अनिल कपूर म्हणाले.अनिस यांच्यासारखे दिग्दर्शक पात्रे लिहितात आणि मग आमच्यासारख्या अभिनेत्यांना अभिनय करता येतो. आज मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा मला 'लखन', 'मिस्टर इंडिया' यासारख्या मी साकारलेल्या पात्रांच्या नावाने बोलवले जाते. आम्हाला मिळत असणाऱ्या या वेगळ्या आणि महत्त्वाच्या प्रसिद्धीसाठी अनिस यांच्यासारखे दिग्दर्शकच कारणीभूत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 

बातम्या आणखी आहेत...