आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Ansh Arora, Who Is In The Hospital, Said Police Forcefully Arrested Him Beats Too Much

यूपी : रुग्णालयात आहे अभिनेता अंश अरोरा, म्हणाला - 'पोलिसांनी जबरदस्ती अटक करून अमानुष मारहाण केली'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : सीरियल 'कसम', 'तनहाइयां' आणि 'क्वींस' मध्ये दिसलेला अभिनेता अंश अरोराचे म्हणणे आहे की, तो अशातच गाज़ियाबाद पोलिसांच्या गुंड प्रवृत्तीचा शिकार झाला आहे. अभिनेत्याच्या सांगण्यानुसार, त्याला गाजियाबाद पोलिसांनी जबर्दस्ती अटक केले आणि बेदम मारहाण केली. त्याला थर्ड डिग्री टार्चर केले गेले. सध्या अंश नवी दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. दैनिक भास्करसोबत बोलताना अंशने संपूर्ण प्रकरण सांगितले.  

 

बर्गर न घेतल्यामुळे झाला मॉलच्या कॅशियरसोबत वाद... 
"11 मेच्या रात्री गाजियाबाद (उत्तर प्रदेश) च्या वैशाली सेक्टर-5 स्थित 24x7 शॉप्रिक्स मॉल स्टोरमध्ये गेला होता. त्या रात्री मी काहीवस्तू खरेदी केल्या आणि बर्गरची ऑर्डर दिली, जो येण्यासाठी सुमारे 35-40 मिनिटांचा वेळ लागला. मी स्टोरच्या काशीयरला ऑर्डर कंसाला करायला सांगितले. काशीयरचे म्हणणे होते की, ती आर्डर कंसाला होऊ शकत नाही. कारण बिलिंग झाले होते. निश्चितच त्याचे म्हणणे योग्य होते. त्यामुळे मी त्याला पैसे घेऊन ऑर्डर कंसाला करायला सांगितली. कारण मी इतकावेळ वाट पाहू शकत नव्हतो. पण तो कॅशियर मला बर्गर घेऊन जा से म्हणत होता. त्यामुळेच आमच्यामध्ये वाद झाले आणि सर्व सामान काउंटरवर आदळून रागात तेथून निघून आलो."

 

"दुसऱ्या दिवशी मी पूर्णवेळ माझ्या कामात होतो आणि उशिरा घरी पोहोचलो. ते स्टोर घराच्या जवळच आहे आणि नेहमी आमचे तेथे येणे जाणे सुरु असते. त्यामुळे त्या रात्री मी 1: 30 - 2: 00 च्या दरम्यान तेथे गेलो. मी तिथे एका दिवसापूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी गेलो होतो. पण पोलीस अधिकाऱ्यांनी मला CRPC च्या सेक्शन S-151 अंतर्गत जबरदस्ती अटक केले. दुकानाबाहेर कारजवळ उभा असलेल्या माझ्या भावाने मला पोलीस घेऊन जात असलेले पहिले तर तो माझ्याविषयी विचारपूस करण्यासाठी तेथे आला. पोलिससाणी त्याला समजावून सांगण्याऐवजी जबरदस्ती हे म्हणत व्हॅनमध्ये खेचले की, 'तू याच्यासोबत आहेस ना, तर तुही चल.'

 

पोलिसांनी काठीने केली मारहाण... 
"जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो तेव्हा तेथे 5-6 पोलीस आणखी होते. ज्यांनी आम्ही आत जाताच काठीने आम्हाला बेदम मारायला सुरुवात केली. मारताना ते मला आणि माझ्या फॅमिली मेंबर्सला घाण घाण शिव्या देत होते. माही त्यांच्याकडे सोडण्यासाठी भीक मागत होतो आणि त्यांना विनंती करत होतो की, आमच्या घरी आम्हाला एखादा कॉल करू द्यावा. पण आमच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. आम्हाला मारल्यानंतर सुमारे 2:30-3:00 च्या दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हला लॉकअपमध्ये बंद केले. 

 

जामीन मिळाल्यानंतर रुग्णालयात नेले गेले...  
"मी सतत दया करण्याची भीक मागत होतो पण पोलीस आमहाला मारतच राहिले. जवळ जवळ अर्धा तास आम्हाला अमानुषपणे मारहाण केल्यानंतर,त्यांनी ओढत ओढत लॉकअपमध्ये फेकले. त्यांनतर त्यांच्या एका एका व्यक्तीने लॉकअपमध्ये आणि लॉकअपच्या बाहेर घेऊन आमच्या दोन्ही भावांचे फोटो काढत होते. मग माझ्या आई वडिलांना हे स्पष्टपणे कळाले की, आम्ही लॉकअपमध्ये आहोत. त्याचदिवशी आम्हाला संबंधित मॅजिस्ट्रेटसमोर नेले गेले. जामीन मिळाल्यानंतरच माझे आई वडिल आम्हाला दोघांना रुग्णालयात घेऊन गेले."

बातम्या आणखी आहेत...