...अखेर अभिनेते भाऊ / ...अखेर अभिनेते भाऊ कदम यांनी मागितली आगरी, कोळी समाजाची माफी

दिव्य मराठी वेब टीम

Nov 12,2018 07:02:00 AM IST

एन्टटेन्मेंट डेस्क. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेने आक्षेप घेतला होता. 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमाच्या या भागात आगरी पात्र दाखवण्यात आलं होतं कार्यक्रमातील आगरी पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने केला होता. आता याबाबत अभिनेते भाऊ कदम यांनी त्यांची जाहीर माफी मागितली आहे.

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात जे आगरी, कोळी पात्र दाखवलं, ते आमच्याकडून चुकून झालं. ते पात्र आक्षेपार्ह असून आम्ही तो भाग सगळीकडून डिलीट केला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही आगरी, कोळी बांधवांची जाहीर माफी मागतो. यापुढे आमच्याकडून कोणत्याही समजाचा अपमान होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. अशा शब्दांमध्ये भाऊ कदम यांनी माफी मागितली आहे.

असे आहे प्रकरण
5 आणि 6 नोव्हेंबररोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमाच्या या भागात आगरी पात्र दाखवण्यात आलं होतं. यामधील विनोदी पात्रावर आक्षेप घेण्यात आला होता. आगरी-कोळी भूमिपुत्र संघटनेने कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून याबाबत कळवले होते. त्यांनी पत्रात लिहिले होते की, आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे चुकीचं नाही. पण आगरी पात्राद्वारे आगरी समाजावर चुकीची टीका टीप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं मत आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेनं व्यक्त केला होता. यामुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि यासाठी येत्या 7 दिवसात कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी पत्रातून दिला होता.

X
COMMENT