आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराThat’s Hussein and Srinivas from @jetairways.
— Boman Irani (@bomanirani) August 20, 2018
Thanks Hussien for your warmth, care and help on my way back from Hyderabad. #JetAirways #Hyderabad pic.twitter.com/oPMS4VUeFq
बालपणी बोलायचे बोबडे...
2 डिसेंबर 1959 रोजी मुंबईत जन्मलेल्या बोमन इराणी बालपणी बोबडे बोलायचे आणि त्यांना dyslexia नावाचा आजार होता. त्यांनी 'सेंट मेरी स्कूल' मुंबई येथून शालेय शिक्षण घेतल्यानंतर मीठीबाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेसमध्ये दोन वर्षे नोकरी केली. येथे ते वेटर आणि रुम सर्विस स्टाफचे काम करायचे.
25 रुपयांत विकायचे फोटो...
बोमन यांना फोटोग्राफीची आवड होती. त्यांना कौटुंबिक कारणास्तव हॉटेलची नोकरी सोडावी लागली होती. त्यानंतर 14 वर्षे त्यांनी फॅमिली शॉप सांभाळले. नंतर 1987 साली फोटोग्राफीला सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांत ते 25 रुपयांना फोटो विकत होते.
'मुन्नाभाई...'द्वारे सुरु झाले करिअर...
'3 इडियट्स' मध्ये 'वायरस'च्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेले बोमन यांनी 'मुन्नाभाई एमबीबीएस' (2003) द्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ते लगे रहो मुन्नाभाई, 3 इडियट्स, वीर-जारा, नो एंट्री, डॉन, दोस्ताना, कमबख्त इश्क, हाउसफुल, कॉकटेल, हॅपी न्यू इयर, परमाणु आणि संजू या चित्रपटांमध्ये झळकले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.