आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरच्‍या ऑनस्‍क्रीन वडिलांनी ऑटोला दिली धडक, नशेत तर्रर्र अवस्‍थेत पोलिसांनी घेतले ताब्‍यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता दलीप ताहिलने दारूच्‍या नशेत कार चालवत ऑटोला टक्‍कर दिली आहे. यात ऑटोचालकासह युवक व युवती जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली. यानंतर अभिनेता दलीप ताहिलला खार पोलिसांनी अटक केली होती. नंतर जामिनावर त्‍यांची सुटका करण्‍यात आली.


घटनास्‍थळावरून फरार झाला अभिनेता
ऑटोला टक्‍कर दिल्‍यानंतर ताहिल यांनी घटनास्‍थळावरून पळ काढला होता. मात्र रविवारी रात्री गणेश विसर्जनाच्‍या मिरवणुका सुरू असल्‍याने त्‍यांना जास्‍त दूर जाता आले नाही व अपघातात जखमी झालेल्‍या युवक-युवतीने त्‍यांना पाठलाग करून पकडले. त्‍यानंतर ताहिल यांना कारमधून बाहेर पडण्‍यास सांगितले असता, त्‍यांनी आपल्‍याशी असभ्‍य वर्तवणुक केली, असा आरोपही युवक-युवतीने लावला आहे.


ड्रंक अँड ड्राईव्‍ह केसप्रकरणी अटक
अपघातानंतर खार पोलिसांनी अभिनेता दलीप ताहिल यांना ड्रंक ड्रायव्‍हींग आणि निष्‍काळजीपणाने वाहन चालवण्‍याच्‍या आरोपाखाली अटक केली. येथील पोलिस निरीक्षकांनी सांगितले की, तपासादरम्‍यान ताहिल यांनी ब्‍लड टेस्‍टसाठी सँपल देण्‍यास नकार दिला होता. सध्‍या त्‍यांची जामिनावर सुटका करण्‍यात आली आहे.

 

अनेक मोठ्या सिनेमां‍त केले आहे काम  
ताहिलने  'बाजीगर, 'राजा', 'इश्क' आणि 'सोल्जर' सारख्‍या अनेक हिट  सिनेमांत काम केले आहे.  दिलीप ताहिल यांनी 1988 मध्‍ये आमिर खानचा पहिला सिनेमा 'कयामत से कयामत तक'मध्‍ये त्‍याच्‍या वडीलांची भूमिका साकारली होती.  

 

बातम्या आणखी आहेत...