आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनुश्रीच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल - फरहान अख्तर, ट्विटरव्दारे केला सपोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. आता बॉलिवूडकर तनुश्रीचा सपोर्ट करताना दिसत आहेत. फरहान अख्तरने ट्विट करत तनुश्री दत्ताला सपोरर्ट केला आहे. फरहान म्हणाला की, "तनुश्रीच्या हिंमतीची दाद द्यावी लागले, तिच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत." तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांनी तिच्यावर 10 वर्षांपुर्वी एका फिल्मच्या सेटवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. 

 

This thread is very telling. @janiceseq85 was there at the time of the incident being debated today. Even when #TanushreeDutta had career concerns to keep quiet 10 years ago she did not & her story hasn’t changed now. Her courage should be admired, not her intention questioned. https://t.co/Ola3MNdmtS

— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) September 27, 2018
तनुश्रीच्या सपोर्टमध्ये फरहान अख्तर 
अॅक्टर-डायरेक्टर फरहान अख्तर तनुश्री दत्ताच्या हक्कांसाठी उभा राहिला आहे. जर्नलिस्ट जैनिस सिकेरियाची पोस्ट रिट्वीट करत फरहानने लिहिले की, 'हे धागेदोरे खुप काही सांगत आहे, आज ज्यावर वाद होतेय, त्यावेळी जैसिन तिथे उपस्थित होती. तनुश्री दत्ता 10 वर्षे करिअरच्या चिंतेमुळे गप्प राहू शकत होती, तेव्हाही ती बोलली आणि अजुनही तिची कहानी बदललेली नाही. तिच्या हेतूंवर प्रश्न चिन्ह उपस्थित न करता, तिच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल.'

 

 

बातम्या आणखी आहेत...