आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षे लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत रोमांटिक मूडमध्ये दिसला 45 वर्षीय अभिनेता, घटस्फोटित आणि 2 मुलींचा पिता आहे हा अभिनेता, कधी शक्ति कपूरच्या मुलीसोबत लिव्ह-इनमध्ये राहिल्याची होत होती चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर 45 वर्षांचा झाला आहे. 9 जानेवारीला बर्थडेच्या निमित्ताने फरहानची गर्लफ्रेंड आणि सिंगर शिबानी दांडेकरने एक फोटो शेयर केला. या फोटोमध्ये फरहान आणि शिबानी रोमांटिक मूडमध्ये दिसत आहेत. शिबानीने लिहिले, Because he has the coolest tattoo in the world and because it’s his bday! Happy birthday my sweet grumps, love you loads @faroutakhtar. हा फोटो कपलच्या बीच हॉलिडेदरम्यानचा आहे, ज्यामध्ये शिबानी बिकिनीमध्ये तर फरहान शर्टलेस होऊन कोझी पोज देत आहे. शिबानी आणि फरहान मागच्या 3 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांची भेट 2015 मध्ये शो 'आय कॅन डू दॅट' मध्ये झाली होती. फरहान त्या शोला होस्ट करत होता आणि शिबानीही त्या शोचा भाग होती. शिबानीने सलमानच्या फिल्म 'सुल्तान' मध्ये काम केले आहे. यासोबतच ती शिबानी मॉडल आणि प्रसिद्ध एमटीवी व्हीजे अभिनेत्री-सिंगर अनुषा दांडेकरची बहीण आहे. तिने 2014 मध्ये आलेला मराठी चित्रपट 'टाइमपास' मध्ये आइटम नंबरने सुरुवात केली होती. यानंतर 2015 मध्ये 'रॉय', 'नाम शबाना', 'नूर', 'भावेश जोशी' आणि 'शानदार' अशा चित्रपटातही दिसली आहे. 

 

2 मुलींचा पिता आहे फरहान अख्तर... 
फरहान अख्तर आणि त्याची एक्स वाइफ अधुनाने एप्रिल, 2017 मध्ये घटस्फोट घेतला. दोघे 17 वर्षानंतर वेगळे झाले. यांचे लग्न 2000 मध्ये झाले होते.  म्हणले जाते की, फरहानच्या लाइफमध्ये श्रद्धा कपूर आल्यांनतर रोज त्याचे त्याच्या पत्नीसोबत वाद व्हायचे. हळू हळू वाद वाढत गेले आणि फायनली दोघांनी घटस्फोट घेतला. अधुना आणि फरहानला दोन मुली आहेत. ज्यांचे नाव शाक्या (15 वर्ष) आणि अकीरा (7 वर्ष) आहे. घटस्फोटानंतर दोन्ही मुली आईसोबतच राहतात. 

 

श्रद्धा कपूरसोबत लिव्ह-इनमध्ये राहिल्याची होती चर्चा... 
- जानेवारी, 2017 मध्ये फरहान आणि श्रद्धा कपूरच्या लिव्ह-इनमध्ये राहण्याची चर्चा होती. त्यावेळी श्रद्धाचे वय 30 वर्षे तर फरहानचे वय 43 वर्ष होते. सांगितले जाते की, श्रद्धाचे पिता शक्ति कपूर स्वतः फरहान अख्तरच्या घरी पोहोचले आणि श्रद्धाला तिथून जबरदस्ती आपल्या घरी घेऊन आले. मात्र नंतर शक्ति कपूर आणि श्रद्धा कपूर दोघांनीही हे सर्व खोटे असल्याचे सांगितले. रिपोर्ट्सनुसार, फिल्म 'रॉक ऑन 2' मध्ये काम करताना फरहान आणि श्रद्धाची जवळीक वाढली होती. यांनतर फरहान जुहूचे घर सोडून श्रद्धासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. 
- वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर फरहान अख्तर सध्या सोनाली बोसची फिल्म 'स्काय इज पिंक' मध्ये काम करत आहे. यामध्ये त्याच्यासोबत प्रियांका चोप्रादेखील आहे. तसेच श्रद्धा कपूरही लवकरच फिल्म 'साहो' आणि 'शटलर' सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. 

 

35 कोटींच्या घरात राहतो फरहान
- फरहान बॅण्डस्टॅण्ड, मुंबईमधील आपल्या 10 हजार Sqft मध्ये पसरलेल्या बंगल्यामध्ये राहतो. त्याच्या घराचे नाव Vipassana आहे, ज्याची किंमत 35 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 
- फरहानने हे घर 2009 खरेदी केले होते जे त्याची आई हनी ईरानीच्या घराजवळ आहे. सोबतच फरहानच्या घरापासून सलमानचे गॅलेक्सी अपार्टमेंट आणि शाहरुख खानचे मन्नतही खूप जवळ आहे. 
- जर फरहानच्या प्रॉपर्टीविषयी बोलायचे झाले तर त्याचे नेटवर्थ 144 कोटींच्या जवळजवळ आहे. तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न 22.4 कोटी रुपये आहे. 

 

View this post on Instagram

Eid Mubarak to all. Love.

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on Jun 26, 2017 at 3:25am PDT

बातम्या आणखी आहेत...