आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Gulshan Devaiya Said, 'Ranveer Used To Threaten With Love, If You Deepika Hurts, You Will Have To Pay For That'

अभिनेता गुलशन देवैय्या म्हणाला, 'रणवीर प्रेमाने धाक दाखवत म्हणायचा, दीपिकाला त्रास दिला तर खैर नाही'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाला एक वर्ष झाल्यानिमित्त त्यांच्या प्रेमकथेविषयी त्यांचा मित्र गुलशन देवैयाने दिव्य मराठीला सांगितल्या आठवणी... 


मी 'गोलियों की रासलीला : मध्ये मी दीपिका आणि रणवीर दोघांसेाबत काम केले होते. याच चित्रपटातून दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. मात्र ती प्रेमकथा कशी सुरू झाली याविषयी कुणालाही माहिती नाही. चित्रपटाच्या उदयपूरच्या दुसऱ्या भागात दोघांमध्ये प्रेमाची भावना 0 दिसली. पहिल्या शेड्यूलचे शूटिंग इनडोअर मुंबईत झाले. त्यानंतर 'लहू मुंह लग गया' गाण्याचे शूटिंग सुरू होते. त्या काळात दोघेही आपसात चांगले मिसळले होते, परंतु त्यांच्यात कोणतेही विशेष असे आकर्षण जाणवत नव्हते. त्या वेळी दोघेही कामात व्यग्र होते.


पहिल्या शेड्यूलमध्ये दीपिकाने दुबईमध्ये एक कार्यक्रमदेखील केला होता. त्याच वेळी तिचा 'कॉकटेल' हा दुसरा चित्रपटदेखील रिलीज होणार होता, त्यामुळे ती व्यग्र होती. पहिल्या शेड्यूलच्या एक महिन्यानंतर, पुढच्या १२ ते १५ दिवसांचे दुसरे शेड्यूल उदयपुरात सुरू झाले होते, त्यानंतर दोघांमधील केमिस्ट्री अप्रतिम होती. त्या वेळी मला जाणवलं, त्यांच्यात काहीतरी खिचडी शिजतेय. दोघांचे बोलणे-चालणेदेखील बदलले होते. त्या वेळी रणबीर खूप खुश खुश दिसत होता. चेहऱ्यावर दिवसभर स्मितहास्य घेऊन तो फिरत असे. दीपिकादेखील आनंदी दिसायची. दोघाची जोडी खूपच चांगली दिसायची. सेटवर एकमेकांना पाहायचे, हसायचे, बोलायचे यावरून लगेच कळायचे. शूटिंग नसल्यावर एकमेकांसोबत तासनतास गप्पा मारत बसायचे. मला जेव्हा ते खटकले तेव्हा मी रणबीरला विचारले, भाऊ, काय सुरु आहे सध्या ? तुमच्या दोघांमध्ये प्रेमाची ठिणगी कधी पडली ? उत्तरेत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते...!


त्यांच्यात असे काही घडेल याचा मी विचारही केला नव्हता. कारण सुरुवातीला सेटवर ते वेगळ्या पद्धतीने वागायचे. मला जेव्हा कळाले, तेव्हा अवाक् झालो. खरं तर मला दुसऱ्या शेड्यूलमध्ये माहिती पडले. आधी क्रूमेंबर्सला माहिती झाले होते तेव्हा मी कामात व्यग्र होतो. भन्साळीसरांसोबत पहिल्यांदाच काम करत होतो. त्यामुळे कामावरचा जास्त फोकस होते. मात्र त्यांची मैत्री पाहून मला हळू-हळू कळू लागले.


रणवीर दीपिकाची अत्यंत काळजी घेतो हे सर्वांना माहीतच आहे..., यासंदर्भात एक रंजक कथा सांगतो, 'रामलीला'च्या सेटवर ताे मला गमतीत दीपिकाबद्दल सतर्क राहायला सांगत असे. उदयपुरात आम्ही एक सीन चित्रीकरण करत होतो, त्यात मला दीपिकाला ओढत न्यावे लागणार होते. तो शॉट चित्रीकरण करण्यापूर्वी रणवीर माझ्याकडे आला आणि मला प्रेमाने धमकावले, 'बघ, दीपिकाला ओढताना तिला दुखापत झाली तर तुझी खैर नाही.' खरं तर दीपिका स्वत:च खूपच स्ट्राँग आहे. अॅथलिट आणि बॅडमिंटन खेळाडू आहे. तिचे स्वत: चे शरीर संतुलन चांगले आहे. अशा वेळी तिला ओढणे माझ्यासाठी टेन्शन होते, मला त्या वेळी घाम सुटला होता. खरं तर रणवीर हे सर्व विनोदात म्हणायचा, पण तो किती काळजी घेतो त्याचे हे त्याचे एक उदाहरण आहे.


आणखी एक गोष्ट लक्षात येतेय की, दोघांनाही पहिले तर ते एकमेकांसाठी बनले आहेत, असे वाटत नव्हते. कारण दोघांचा दृष्टिकोन एकमेकांपासून पूर्णपणे वेगळा आहे. दीपिका खूप शांत आणि स्वाभिमानी आहे. रणवीरच्या बाबतीत असे नव्हते. प्रत्येकाला त्याच्या ऊर्जा पातळीबद्दल माहिती आहे. त्याच्या अभिनयातूनच सर्व काही उघड हाेते. परंतु या विपरीत स्वभावाच्या असूनही दोघेही एकमेकांना उत्तम सांभाळून घेतात. ते कसे राहतात याबद्दल अचूक उत्तर कोणाकडेही नाही. दोघेही एकत्र काहीही करतात, मात्र चांगले दिसतात. खासगी आयुष्यात दीपिका रणवीरला नक्कीच शांत ठेवते, असे मला वाटते.


खरं तर दोघांची जोडी खूपच छान शोभून दिसते. ते चांगले कामही करत आहेत. शिवाय लग्नाच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी एवढेच म्हणणे की, 'यह फेविकोल का मजबूत जोड़ है, कभी टूटेगा नहीं.' याचे कारण असे की, दोघांमध्ये भरपूर प्रेम आहे, शिवाय ते एकमेकांना साथ देेतील. जेव्हा ते सोबत असतात तेव्हा त्यांच्यातील प्रेम दिसून येते, एका जन्माचे नव्हे तर ते साता जन्माचे सोबती आहेत, असे मला वाटते.