आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Karan Patel And Bhojpuri Actress Rani Chatterjee Along With Many Celebrities Will Be Seen In The Show 'Khatron Ke Khiladi 10'

'खतरों के खिलाडी 10' च्या कन्टेस्टंटची नावे आली समोर, करण पटेलसह भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीदेखील शोमध्ये दिसणार आहे 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : बहूचर्चित गेम शो 'फियर फॅक्टर, खतरों के खिलाड़ी सीजन 10' चे शूटिंग 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे आणि एका महिन्यापेक्षा जास्तवेळ चालणार आहे. यावेळी शोचा सेट बुल्गारियामध्ये लावला गेला आहे. शोचे सर्व 10 स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. यावेळी तिची अभिनेते, अँकर, आर जे पासून ते कॉमेडियनपर्यंत सर्व असणार आहेत. आधी माजी क्रिकेटर युवराज सिंह, सिंगर नेहा भसीन आणि सुमोना चक्रवर्ती यांची नावे समोर येत होती. पण कन्टेस्टंटची लिस्ट समोर येताच हे स्पष्ट झाले की, या तिघांनाही या शोचा भाग बनवले गेले नाहीये. 

 

चला तर जाणून घेऊया सर्व स्पर्धकांची नावे.... 
करण पटेल... 

रोहित शेट्टीच्या खेळाडूंमध्ये सर्वात पहिले नाव सामील झाले ते म्हणजे अभिनेता करण पटेल याचे. गेम शोसाठी टीव्ही सीरियल 'ये हैं मोहब्बतें' चा मुख्य अभिनेता करण अॅक्शन करताना दिसणार आहे.  

 

धर्मेश येलांदे... 
कोरियोग्राफर धर्मेश येलांदे यालादेखील शोसाठी अप्रोच केले गेले आहे. मात्र अद्याप त्याने होकार दिलेला नाही. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे सध्या धर्मेशकडे आणखी काही कमिटमेंट्स आहेत आणि तो त्या सर्व कमिटमेंट्स सांभाळून शोमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करत आहे. धर्मेश चित्रपट 'स्ट्रीट डान्सर' मध्ये दिसणार आहे.  

 

अदा खान... 
आगामी सीजनमध्ये अभिनेत्री अदा खानदेखील दिसणार आहे. स्वतः अभिनेत्रीने ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. ती म्हणाली, 'हो, मी 'खतरों के खिलाड़ी' मध्ये भाग घेत आहे आणि हा माझा पहिला रियलिटी शो असणार आहे. मी स्वतःलाच चॅलेंज करू इच्छित होते.'

 

अमृता खानविलकर...  
अमृता खानविलकरदेखील या शोचा भाग आहे. ती चित्रपट 'राजी', 'सत्यमेव जयते', 'गोलमाल' यांसारख्या चित्रपटात दिसली आहे. याव्यतिरिक्त ती मराठी चित्रपटातही खूप सक्रिय आहे.  

 

तेजस्वी प्रकाश...  
'स्वरागिनी', 'पहरेदार पिया की', 'कर्ण' यांसारख्या टीव्ही सीरियलमध्ये दिसलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिचेदेखील नाव या गेम शोसाठी फायनल केले गेले आहे.  

 

बलराज सायाल...  
अभिनेता - कॉमेडियन बलराज सयाल हादेखील 'खतरों के खिलाड़ी' मध्ये दिसणार आहे. 

 

करिश्मा तन्ना... 
'बिग बॉस' ची एक्स कन्टेस्टंट करिश्मा तन्नादेखील यावेळी शोमध्ये दिसणार आहे. 'बिग बॉस' नंतर करिश्माला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ती रणबीर कपूर स्टारर संजूमध्ये दिसली होती.  

 

शिविन नारंग... 
शिविरला 'वीरा', 'इंटरनेट वाला लव' आणि 'इश्क में मर जावां' यांसारख्या शोमध्ये पहिले गेले होते. त्याने आपल्या करिअरची सुरुवात 2012 मध्ये 'सुवरीन गुग्गल- टॉपर ऑफ द ईयर' या मालिकेने केली होती.  

 

आर जे मलिश्का...  
शोमध्ये मुंबईची प्रसिद्ध आर जे मलिश्का मेंडसोना बोलण्याऐवजी अॅक्शन करताना दिसणार आहे. मलिश्का यापूर्वी डान्स रियलिटी शो 'झलक दिखला जा' मध्येही दिसली होती. तिला प्रसिद्धी आपला शो मॉर्निंग नंबर वन विद मलिश्काने मिळाली आहे. 

 

राणी चॅटर्जी... 
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी देखील शोचा भाग आहे. ती चित्रपट 'ससुरा पैसा वाला', 'साती' आणि 'रानी नंबर 786' यामध्ये दिसली आहे. आधी बातमी होती की, ती 'बिग बॉस' चा भाग बनू शकते पण आता स्पष्ट झाले आहे की, ती घरात नाही तर हवेत अॅक्शन करताना दिसणार आहे.