Home | News | actor kishor pradhan pass away at age of 86

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान काळाच्या पडद्याआड, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 10:13 AM IST

100 पेक्षा जास्त मराठी आणि 18 इंग्रजी नाटकांमध्ये केले काम

  • actor kishor pradhan pass away at age of 86

    मुंबई. मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे रात्री उशीरा मुंबईमध्ये निधन झाले. आपल्या अभिनयाने त्यांनी मराठी आणि इंग्रजी रंगमंचावर आपली विशेष छाप सोडली होती. मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच 'शिक्षणाचा आयचा घो', 'लालबाग परळ', 'भिंगरी', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटातील खट्याळ आजोबा, 'जब वुई मेट'मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. तसंच दूरदर्शन वाहिनीवरील गजरा कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभासोबत सादर केला होता.

    नागपुरमध्ये झाला होता जन्म

    किशोर यांचा जन्म नागपुरच्या एका प्रतिष्ठीत कुटूंबात झाला होता. त्यांना अभिनय हा वारसामध्ये मिळाला होता. त्यांच्या आई मालतीबाई प्रधान या 40 वर्षे मराठी रंगमंचाशी जोडल्या गेल्या होत्या. किशोर यांनी नागपुरच्या मारिस महाविद्यायातून आपले 12 वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. यानंतर 'टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स'मध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून दोन वर्षे काम केले. या दरम्यान त्यांनी अनेक मोठ्या स्टेज शोमध्ये काम केले. त्यांनी 100 पेक्षा जास्त मराठी आणि 18 इंग्रजी नाटकांमध्ये काम केले. त्यांचे पहिले इंग्री नाटक 'बॉटम अप्स' हे होते.


Trending