आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता मिथुन चक्रवर्ती हॉस्पिटलमध्ये केले दाखल, अॅक्शन सीन करताना झाली होती मोठी दुखापत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना अमेरिकेतील लॉस एंजलिसच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी अमेरिकेत जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार ते अमेरिकेतील रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलगा महाअक्षय चक्रवर्ती आणि सून मदालासा शर्माही अमेरिकेत आहेत.

 

2009 मध्ये 'लकी' या सिनेमातील एक अॅक्शन सीन करताना मिथुन चक्रवर्तींना दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना पाठदुखीचा त्रास जडला. याच पाठदुखीवर उपचार करण्यासाठी ते अमेरिकेतील रुग्णालयात दाखल झाले आहेत. 2009 मध्ये दुखापत झाल्यावर त्यांनी उपचार केले. मात्र 2016 मध्ये त्यांना पाठदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी एक मोठा ब्रेक घेऊन या पाठदुखीवर इलाज केले. पाठदुखीचा त्रास त्यांना जास्त होऊ लागल्याने त्यांनी काम करणेही सोडले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...