आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता मिथुन चक्रवर्तीने दिली संघ मुख्यालयाला भेट; भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - अभिनेता मिथुन चक्रवर्ती याने संघ मुख्यालयाला गुरुवारी भेट दिली. गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेल्या मिथुन चक्रवर्तीने संघ मुख्यालयी भेट दिल्याने चर्चांना उधाण आले. यासंदर्भात महानगर प्रचारक प्रमुख समीर गौतम यांच्याशी संपर्क साधला असता नागपुरात येणारे अनेक जण उत्सुकतेने संघभूमीला भेट देतात. मिथुन चक्रवर्ती हा त्यापैकीच एक आहे, असे सांगितले. काही दिवसांपूर्वी अभिनेते खासदार सनी देओल यांनीही भेट दिली होती. मिथुन चक्रवर्तीने हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची माहिती घेत तेथे चालणाऱ्या कार्यक्रमांची माहिती घेतली, असे ते म्हणाले.    

सरसंघचालक मोहन भागवत गुरुवारी नागपुरातच पूर्वनिर्धारित कार्यक्रमात व्यग्र असल्यामुळे मिथुन चक्रवर्तीची मोहन भागवत यांच्याशी भेट होऊ शकली नाही,  असेही या वेळी सांगण्यात आले.