आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनुश्रीच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुंबईत पत्रकारांशी संवाद..\'मला जे बोलायचे ते मी 10 वर्षांपूर्वीच बोललोय\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 'सत्‍य आहे ते कायम सत्‍यच राहते, ते बदलत नाही, असे म्‍हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रसारमाध्‍यमांना कुठल्‍याही प्रकारची माहिती देण्‍यास नकार दिला. 10 वर्षांपूर्वीच मी बोललोय, असेही नानांनी यावेळी सांगितले. 

 

सोमवारी नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेत ते अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्‍या आरोपांवर जाहीरपणे उत्तरे देणार होते. परंतु, आपणास वकिलांनी माध्‍यमांशी न बोलण्‍याचा सल्‍ला दिल्‍याचे नानांनी प्रसारमाध्‍यमांना सांगितले. नाना पाटेकरांनी एका मिनिटात पत्रकार परिषद संपवली.

 

काही दिवसांपूर्वी झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून ती आपली बाजू प्रत्येकवेळी मांडत आली. बॉलिवूडमधूनही सोनम कपूर, कंगना रनोट, फरहान अख्तर यांसारख्या कलाकारांचे तिला समर्थन मिळाले होते. पण नाना याविषयावर काहीही बोलले नाही. इतकेच नाही तर जयपूरमध्ये साजित खान दिग्दर्शित 'हाउसफूल' चित्रपटाच्या पुढच्या भागाच्या चित्रीकरणालाही ते अनुपस्थित होते. नाना या सगळ्यांवर काय मत मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. नाना पत्रकारांसमोर आले पण त्यांनी या सर्व विषयावर बोलणे कटाक्षाने टाळले आहे. अवघ्या एका मिनिटात त्यांनी पत्रकार परिषद आटोपली घेतली. दरम्यान, नाना पाटेकराच्या वकिलांनी तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटिस पाठवली आहे. 

 

पत्रकार परिषद रद्द होणार असल्याची होती चर्चा 

सोमवारी, दुपारी तीन वाजता नाना पाटेकर मुंबईमध्ये पत्रकार प‍रिषदेत बोलणार होते. परंतु त्यांचा मुलगा मल्हार नाना पाटेकर याने यापूर्वीच एक मॅसेज करुन पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती दिली होती.

 

काय म्हणाला होता मल्हार 

"मी यावेळी मॅसेज करण्यासाठी माफी मागतो, परंतु तुम्हा सर्वांना एकच सांगायचे आहे की, पत्रकार परिषद  रद्द करण्‍यात आली आहे. प्लीज तुम्ही तुमच्या मीडिया कलीग्सलाही ही माहिती पाठवा. आम्ही तुम्हाला पुढे याविषयी अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करु."

 

'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर झाली होती तनुश्रीसोबत हरॅसमेंट
तनुश्रीने आरोप केले होते की, 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर तिने जे सहन केले त्यासाठी नाना पाटेकरसोबत फिल्मचे प्रोड्यूसर सामी सिद्दिकी, डायरेक्टर राकेश सारंग आणि कोरियोग्राफर गणेश आचार्य जबाबदार होते. तथापि, त्यांनी नानासोडून इतर कुणाबद्दलही जास्त काही म्हटले नाही.

 

- तनुश्रीने सांगितले होते की, नाना पाटेकरची सेटवर गरजच नव्हती, तरीही ते आले आणि कोरियोग्राफरला म्हटले की, तू बाजूला हो, मी डान्स शिकवतो. तनुश्रीच्या मते, नानाने शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तिच्याशी लगट करणे सुरू केले होते. तिला कुठेही खेचू लागले होते. ती म्हणते की, अभद्रपणा केल्यानंतर नानाला तिच्यासोबत इंटीमेट सीन करण्याची कल्पना आली. जेव्हा तिने नानाची तक्रार प्रोड्यूसरला केली, तेव्हा त्याने दुर्लक्ष केले. फक्त यासाठी कारण ती बॉलीवूडमध्ये नवी होती.

बातम्या आणखी आहेत...