आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता निखिल खुराणा म्हणाला, 'सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवण्यासाठी नव्हे, फिट राहण्यासाठी करतो वर्कआऊट'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : जीजाजी छत पर हैं' फेम निखिल खुराणा आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतो. त्याला जिममध्ये जाणे आवडत नसले तरी संधी मिळाल्यानंतर तो सेटवरच व्यायाम करायला सुरुवात करतो, माध्यमाशी बोलताना निखिलने आपल्या फिटनेसचे मंत्र शेअर केले.....

तुझ्या मते फिटनेस म्हणजे काय?

माझ्यासाठी फिटनेस म्हणजे जीवन जगण्याचे माध्यम आहे. मी दररोज व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो. मला जिममध्ये जायला आवडत नाही. कारण मला असे वाटते की, आपण कुठेही कधीही व्यायाम करू शकतो. यासाठी मी कॅलिस्थेनिक्स करत आहे. सेटवर मी चिन अप बार ठेवले आहे.

तुझा फिटनेस मंत्र काय आहे?

ज्या फिटनेसचे मी पालन करतो. ते म्हणजे नियमित व्यायाम आणि योग्य आहार, मी सिक्स पॅक बनवण्यासाठी नव्हे, तर फिट राहाण्यासाठी करतो.

शरीर आणि मन यांच्यात संतुलन कसे ठेवतो?

मी दररोज माझे मन आणि शरीर यामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतो. मी माझे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुमचे मन शांत असेल तर ते तुमच्या शरीरावरून दिसून येते, शांत मन शरीर निरोगी ठेवते आणि तुम्हाला अनेक आजारापासून दूर ठेवते, असे माझे मत आहे.

आपली व्यग्र आणि डिमांडिंग दिनचर्या जगत असताना स्वत:ला कसे फिट ठेवणार आणि एक निरोगी जीवनशैली कशी टिकवणार?

'जीजाजी छत पर है'च्या सेट वर मी एक पुलअप बार ठेवला आहे, सेटवर जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी पुलअप्स करतो किंवा रनिंगला जातो. कारण मला जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. सध्यातरी मी माझे वर्कआऊट रुटीन नियमित करण्याचा प्रयत्न करत आहे.

वर्कआऊट करत असताना तुला कोणते संगीत एेकायला आवडते?

हे माझ्या मूडवर अवलंबून आहे. परंतु सहसा जास्त एनर्जी असलेले संगीत ऐकायला आवडते. यामुळे मला वर्कआऊट करण्यास प्रोत्साहन मिळते.

अशी कोणती गोष्ट आहे, जी खाण्यास तुम्ही विसरत नाही?

कोणताही गोड पदार्थ पाहिल्यानंतर मी स्वत:ला थांबवू शकत नाही, मला गोड पदार्थ खूप आवडतात.

चाहत्यांसाठी काही फिटनेस टिप्स देणार का?

कमीत कमी एक तास रोज ‌व्यायाम करा, योगा किंवा जिम कोणताही व्यायाम असला तरी रोज करा. त्याबरोबरच योग्य आहार घेणे तितकेच आवश्यक आहे, फिट राहा आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या.

बातम्या आणखी आहेत...