Home | Gossip | actor pankaj tripathi buys his dream house in madh island

मुंबईच्या मड आयलँडमध्ये पंकज त्रिपाठीने बनवले आपल्या स्वप्नातील घर, विसरू शकला नाही आपले जुने दिवस, एका रूमच्या घराची आठवण काढून झाला इमोशनल

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 16, 2019, 11:19 AM IST

एकेकाळी पावसाळ्यातील सोसाट्याच्या वाऱ्याने उडाले होते घरावरील पत्राचे छप्पर : पंकज

 • actor pankaj tripathi buys his dream house in madh island

  मुंबई : वेब सीरीज 'मिर्जापुर' मध्ये दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारा 'कालीन भईया' म्हणजेच पंकज त्रिपाठीने अशातच आपल्या स्वप्नातील घर मुंबईच्या मड आयलँडमध्ये खरेदी केले. पण आजही तो आपले एका रूमचे घर विसरू शकला नाही. त्याने एका इंटरव्यूमध्ये सांगितले, "माझे पत्र्याच्या छताचे घर होते. एके दिवशी पाऊस आणि जोराच्या हवेने छतासोबत एक चादरदेखील उडून गेली. त्यांनतर आम्ही फक्त आकाशाकडे पाहत होतो."

  पंकजचे प्रेरणास्थान आहे मनोज वाजपेयी...
  पंकज त्रिपाठीने आपला फिल्मी प्रवास सांगत सांगितले की, मनोज वाजपेयी त्याची प्रेरणा आहे. कारण तेदेखील ग्रामीण बिहारहुन फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले आहेत. यामुळे त्याला वाटले की, जर मनोज अभिनेते बनू शकतात तर मी का नाही ? यासोबतच पंकज त्रिपाठीने सांगितले की, "काही वर्षांपूर्वी मला जो रोल ऑफर केला जात होता तो मी करत असे पण आता मी स्वतः माझ्यासाठी रोल निवडू शकतो."

  सायकलवरून जायचा बिस्मिल्लाह खान यांचे कॉनसर्ट पाहायला...
  पंकजने पुढे सांगितले की, त्याला सुरुवातीच्या दिवसात फिल्ममध्ये काही इंटरेस्ट नव्हता. उलट त्याला सांस्कृतिक गोष्टी जास्त आवडायच्या. तो सायकलवरून बिस्मिल्लाह खान यांचे कॉनसर्ट पाहायला जायचा. मात्र त्याला संगीत फार काही समजायचे नाही. पण तो तरीही खूप मनापासून ते ऐकायचा. याव्यतिरिक्त त्याला सिनेमाऐवजी थिएटर जास्त आवडायचे. मात्र हळू हळू पंकजला या गोष्टीची जाणीव झाली की, थिएटरमध्ये ना पैसे आहेत ना त्याचे काही भविष्य. त्यांनतर तो मुंबईकडे निघाला आणि फिल्ममध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. पंकज त्रिपाठीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे तर तो रणवीर सिंहच्या '83' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Trending