आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actor Prakash Raj To Fight Election In Upcoming Loksabha Elections

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियल लाइफमध्ये राजकारणात उतरणार 'जयकांत शिकरे', लोकसभा लढवणार, म्हणाले-'अबकी बार जनता की सरकार'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सिंघम चित्रपटात राजकारण्याची भूमिका केलेल्या प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर नव्या वर्षाची शुभेच्छा देत राजकारणात पदार्पणाची घोषणा केली आहे. आगामी 2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे प्रकाश राज यांनी जाहीर केले. मतदार संघाबाबत लवकरच घोषणा करणार असल्याचे सांगत, अबकी बार जनता की सरकार.. असा नाराही त्यांनी लगावला आहे. 

HAPPY NEW YEAR TO EVERYONE..a new beginning .. more responsibility.. with UR support I will be contesting in the coming parliament elections as an INDEPENDENT CANDIDATE. Details of the constituency soon. Ab ki baar Janatha ki SARKAR #citizensvoice #justasking in parliament too..

— Prakash Raj (@prakashraaj) December 31, 2018

प्रकाश राज देशातील राजकारणाबाबत रोख ठोकपणे भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. राजकारणावर मौन न बाळगता परखड मत मांडणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. प्रकाश राज यांनी अनेक वेळा मोदी सरकारच्या विरोधात थेट टीकाही केली आहे. देशातील विविध मुद्द्यांवर ते मते मांडत असतात. 

 


पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर प्रकाशराज यांनी टीका केली होती बाय बाय बीजेपी.. एकापाठोपाठ एक भाजपचा पराभव होत आहे, त्याचे कारण सर्वांनाच माहिती आहे असे म्हणत प्रकाश राज यांनी काही फोटोही पोस्ट केले होते. 

CITIZENS mann ki baat .. elections after elections.. BYE BYE BJP💪💪 ...do you all know the reasons. OR when will you think ..with REASON #justasking pic.twitter.com/tlCZAHoHJz

— Prakash Raj (@prakashraaj) December 11, 2018

एक्झिट पोलच्या निकालानंतर केलेले ट्वीट...

As the CITIZENS are expressing their mann ki baat through EXIT POLLS ... some one has shared this Aapas ki baat ... #justasking pic.twitter.com/EuOBpwHON0

— Prakash Raj (@prakashraaj) December 7, 2018