आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शेतकऱ्यांच्या मुलांची प्रेमयात्रा, अभिनेते प्रविण तरडे आणि रविकांत तुपकर यांनी घेतली दिव्य मराठीच्या ‘माैन साेडू चला बाेलु’ शपथ

6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • यावेळी देऊळबंद सिनेमाचे निर्माते कैलास वाणी, मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकार रमेश परदेशी उपस्थइत होते

पुणे- व्हॅलेंटाइन डे निमिटाने प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जाताे. सध्या जाती आणि धर्माच्या बेगडी अस्मितेमुळे समाज मने दुगंभली गेली आहे. प्रेम जिव्हाळयाचे माध्यमातून समाजाला एकरुप ठेवण्याकरिता आणि शेतकऱ्यांच्या फुलांना यामुळे निर्यातक्षम बाजारपेठ निर्माण व्हावी या उद्देशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर गुडलक चाैक ते शेतकरी महाविद्यालय चाैक यादरम्यान ‘प्रेमयात्रा काढण्यात आली. यावेळी अभिनेते प्रवीण तरडे, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दैनिक दिव्य मराठीच्या ‘माैन साेडू चला बाेलु’ प्रतिज्ञेची शपथ सर्वांना दिली. 


यावेळी देऊळबंद सिनेमाचे निर्माते कैलास वाणी, मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकार रमेश परदेशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमाेल हिप्परगे, राहूल म्हस्के, युक्रांदचे संदिप बर्वे, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या संध्या साेनवणे, सत्यशाेधक किसान सभाचे किशाेर दामले, छात्र भारतीचे रविंद्र मेढे, आम आदमी पक्षाचे अभिजीत माेरे, किसान पुत्र आंदाेलनचे मयुर बागुल, नितीन राठाेड उपस्थित हाेते.


यावेळी रविंद्र तुपकर म्हणाले, शेतकऱ्यांची मुले शहरात शिक्षण, नाेकरीसाठी वास्तव्यास असतात, शहरी मुलांनी ग्रामीण मुलांशी मैत्री केल्याने तरुणार्इची सरमिसळ हाेऊन यामाध्यमातून एकाेपा वाढणार अाहे. हिंगणघाट मध्ये तरुणीवर पेट्राेल अाेतून तिला जिवंत जाळण्यात अाले व या दुर्देवी घटनेत तरुणीचा मृत्यु झाला. या घटना पुराेगामी महाराष्ट्रला लाजवणारी अाहे. त्यामुळे अाम्ही प्रतिज्ञा केली अाहे की, प्रत्येक फुलराणी अाम्ही जपले पाहिजे. तिच्यावर जबरदस्तीने प्रेम करुन अथवा निर्णय न लादता तिचे भावना लक्षात घेऊन तिचा नकार असेल तर ताे समजला पाहिजे व तिचा अादर केला पाहिजे. प्रत्येक फुलराणीचा तिचे स्वत:चे स्वातंत्र्य अाहे त्यामुळे तिच्यावर काेणी बळजबरी करु नये.


प्रेम हे मनातून एकमेकांवर झाले पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटले पाहिजे याकरिता ‘माैन साेडू चला बाेलू’ ही प्रतिज्ञा अाम्ही घेतली अाहे. प्रेमयात्रा ही अागळीवेगळी संकल्पना असून बदलत्या काळात केवळ व्हाॅटसअपवर अापण व्यक्त हाेताे. प्रेमाची संकल्पना माेठी असून ते केवळ मुला-मुलीपुरते मर्यादित नसून ते अार्इ,वडील, शेतकरी, भाऊ, बहिण, प्रियेसी, पत्नी तसेच समाजाच्या प्रत्येक घटकावर ही केले जाऊ शकते. प्रेमाने जग जिंकता येते त्याकरिता सर्वांनी प्रेमाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. 

अभिनेते प्रवीण तरडे म्हणाले, अाजचा दिवस एैतिहासिक असून व्हॅलेनटार्इन डे हा प्रत्येक तरुण मुला-मुलींचा अाणि समाजात जे एकमेकांवर प्रेम करतात त्यांचा अावडता दिवस अाहे. अशादिवशी एका शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचे मुलांना अाणि त्यांचे फुलांवर प्रेम करा अाणि त्यांना किंमत द्या हा संदेश यामाध्यमातून दिला अाहे. मला अानंद वाटताे माझे एमबीए शिक्षण पाॅलीहाऊसवर झाले असून अांतरराष्ट्रीय पातळीवर फुलांचे मार्केटिंक प्राज कंपनीच्या माध्यमातून चार वर्षे करत हाेताे. त्याच फुलांचा एक वेगळा कार्यक्रम  प्रेमयात्रा असून पुणे शहराचे अभिमानाची ही बाब अाहे. हिंगणघाट घटनेनंतर एक ही फुलराणी यापुढे जळणार नाही याकरिता सर्वांनी प्रतिज्ञा घेणे अावश्यक अाहे.


महाराष्ट्रातील तसेच जगातील प्रत्येक माणसाने ही प्रतिज्ञा मनापासून केली पाहिजे. देशात भाषा अनेक अाहेत परंतु प्रेमाची भाषा अमर अाहे. प्रेम करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार असून प्रेमाला नकार देण्याचा अधिकार मुलींना अाहे. मुलींचे अायुष्य तिचे स्वत:चे असून तिला जगण्याचा संपूर्ण अधिकार दिला पाहिजे.

0