आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळच्या पुरात अडकली सुपरस्टारची आई, घरात शिरले पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता पृथ्वीराजच्या आईला रेस्क्यू करताना लोक - Divya Marathi
अभिनेता पृथ्वीराजच्या आईला रेस्क्यू करताना लोक

मुंबई/कोच्चिः धुवाधार बरसणारा पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे केरळमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या शंभर वर्षातील हा केरळमधील सर्वात वाईट पूर आहे असे केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी म्हटले आहे. मदतकार्य जसजसे वेग घेत आहे तसतसा मृतांचा आकडा वाढत चालला आहे. या महापूरात आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू झाला असून 2 लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. 

 

मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन कोच्ची येथील पॉश परिसरात वास्तव्याला आहे. पण त्याच्याही घरात पाणी शिरले आहे. संपूर्ण घरात पाणी शिरल्याने त्याची आई मल्लिका सुकुमारन यांना टबमध्ये बसवून रेस्क्यू करावे लागले आहे. केरळमध्ये 8 ऑगस्टपासून पाऊस सुरु आहे. पाण्याचा स्तर सतत वाढत असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. 17 ऑगस्टच्या रात्री अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याच्याही घरात पाणी शिरले, ज्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले. पृथ्वीराजची आई मल्लिका यासुद्धा गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांना रेस्क्यू करतानाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

 

आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू... 

केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली आहेत. रस्ते बंद झाले असून रेल्वे आणि हवाई सेवेलाही फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडयांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कोची विमानतळ बंद आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून दिवसरात्र बचाव मोहिम सुरु आहे. रेल्वेने राज्यात दीड लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. मदतकार्यात जास्तीत जास्त हेलिकॉप्टर लावण्याची विनंती राज्याने केंद्राला केली आहे. दिल्ली सरकारकडून केरळला 10 कोटींची मदत घोषित केली जाण्याची शक्यता आहे. नौदलाने आयएनएस दीपक ही युद्धनौका मुंबईहून कोच्चीला रवाना केली आहे. यात पिण्याचे आठ लाख लिटर पाणी आहे. आतापर्यंत केरळ येथील महापुरात 324 लोकांना आपले प्राण गमवावे लागले 

आहे.


कोण आहे पृथ्वीराज...
पृथ्वीराज अभिनेत्यासोबतच निर्माता, दिग्दर्शक आणि गायक आहे. त्याने आतापर्यंत 90 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नंदनम (2002), स्वप्नकूडो (2003), कृत्यम् (2005), वास्तवम् (2006), ओरुवन (2007), थिरक्कथा (2008), पोकिरी राजा (2010), सिंहासनम् (2012), लंदन ब्रिज (2014), अनारकली (2015), ऊझम (2016), विमानम् (2017), कूडे (2018) हे त्याचे निवडक गाजलेले चित्रपट आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...