आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित चित्रपट 'आशिकी' रिलीज होऊन या वर्षी जुलैमध्ये ३० वर्षे पूर्ण होतील. नुकतेच या चित्रपटातील कलावंत राहुल रॉय, अनु अग्रवाल, दीपक तिजोरी 'द कपिल शर्मा शो'मध्ये आले होते. या वेळी टीमने जुन्या आठवणींना उजाळा दिला. राहुल रॉयने सांगितले की, माझी या चित्रपटात निवड करण्यासाठी महेश भट्ट यांनी हट्ट धरला होता. मी भट्ट साहेबांना पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा त्यांना माझी हेअर स्टाइल आणि ड्रेसिंग खूप आवडली होती. ते मला या चित्रपटासाठी साइन करत होते तेव्हा इंडस्ट्रीतील प्रत्येक दिग्दर्शक मला प्रमुख भूमिका दिल्यामुळे मला यात घेऊ नका आणि हा प्रयोग अपयशी ठरेल असे महेश यांना सांगत होता. यापैकी बहुतांश लोक म्हणाले होते की, मी नायकासारखाही दिसत नाही. मला आठवते, माझे केस विखुरलेले होते. यामुळे माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे झाकले जात होते. तरीदेखील भट्ट साहेब मला चित्रपटात घेण्यावर ठाम होते.'
राहुल पुढे सांगतो... हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी भट्ट साहेबांसोबत अनेक चित्रपटांच्या सेट्सवर जात होते, जेणेकरून अभिनेत्यांकडे पाहून दिग्दर्शन आणि अभिनयातील बारकावे शिकता येतील. मी अनुपम खेर, मीनाक्षी शेषाद्री आदी दिग्गज कलावंतांचे काम त्या वेळी पाहत होतो. भट्ट साहेबांनी नेहमीच आपल्या मनाचे ऐकले आणि 'आशिकी'साठी मला प्रमुख भूमिका बहाल केली. त्यानंतर जे झाले तो इतिहास बनला. हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा लोक तो पाहण्यासाठी खूप उत्सुक होते, हे मला त्या वेळी कळले. लोक ब्लॅकमध्ये १५०० रुपयांची तिकिटे खरेदी करत होते.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.