Home | News | Actor Raj Kiran Is Missing From 15 Years

15 वर्षांपासून बेपत्ता आहे हा बॉलिवूड अॅक्टर, मृत्यूची बातमी आल्यानंतर ऋषी कपूर यांनी घेतला शोध तर कळले आहे मनोरुग्णालयात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 12:29 PM IST

गेल्या 15 वर्षांपासून राज किरण बेपत्ता आहे.

 • Actor Raj Kiran Is Missing From 15 Years


  मुंबई - तुम इतना जो मुस्कुरा रहे हो..क्या गम है जिस को छुपा रहे हो..‘अर्थ’ चित्रपटामध्ये शबाना आझमीचे दु:ख हलके करण्याच्या उद्देशाने गाणारा राज किरण दु:खाच्या स्फोटाने स्वत:च विस्कळीत झाला आहे.. विमनस्क झाला आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज किरण बेपत्ता आहे. अमेरिकेत कॅब चालवत असल्याची तर कधी अटलांटा येथे मनोरुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले गेले. अनेकांनी तर राज किरण आता या जगात नाही, असेही म्हटले होते. पण काही वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांनी त्याचा शोध घेतला आणि तो अटलांटा येथे मनोरुग्णालयातच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

  मित्राच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर ऋषी कपूर यांनी घेतला होता शोध...
  - राज किरण यांनी 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. 1982 साली स्मिता पाटील आणि शबाना आझमी स्टारर अर्थ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. 1980 मध्ये कर्ज या चित्रपटात ऋषी कपूर आणि 1988 मध्ये एक नया रिश्ता या चित्रपटात रेखासोबत त्याने काम केले. 1994 मध्ये आलेल्या वारिस या चित्रपटात आणि शेखर सुमनच्या मालिकेत तो रिपोर्टरच्या भूमिकेत शेवटचा दिसला होता. 2003 पासून राज किरण बेपत्ता होता. जेव्हा राज किरण याच्या मृत्यूची बातमी पसरली, तेव्हा ऋषी कपूर यांचा यावर विश्वास बसला नाही, आणि त्यांना त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

  यूएसमध्ये राज किरणच्या भावाला भेटले होते ऋषी कपूर

  - 2011 मध्ये ऋषी कपूर अमेरिकेला गेले होते. तेथे राज किरण याचे बंधू गोविंद मेहतानी यांच्याशी ऋषी कपूर यांची भेट झाली आणि हा विषय समोर आला. गोविंद मेहतानी यांनीच ही माहिती ऋषी कपूर यांना दिली. ऋषी कपूर यांनी राज किरणची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण गोविंद मेहतानींकडे धाकट्या भावाचा मोबाईल नंबरही नव्हता. ऋषी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, "मी विचारातच होतो की, राज कुठे गेला असेल? हा प्रश्न वारंवार माझ्या मनात येत होता. त्यामुळे मी यूएसमध्ये राज किरणचा शोध घेण्यासाठी त्याचा मोठा भाऊ गोविंद मेहतानीशी संपर्क साधला. त्यानंतर मला तो अटलांटामध्ये असल्याचे समजले. तो जिवंत आहे, हे कळल्यानंतर मला बरे वाटले. पण राजला मनोरुग्णालयात ठेवण्यात आले आहे. राज स्वतःच्या उपचारांचा खर्च स्वतःच उचलत आहे. यासाठी तो हॉस्पिटमध्येच काम करतो." दरम्यान एका रिपोर्टनुसार, राज मनोरुग्णालयात असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची साथ सोडल्याचे समोर आले आले होते. राज किरणच्या कुटुंबीयांनी मात्र याचे खंडन केले होते.

  भाऊ म्हणाला होता - माझ्याजवळ नंबर नाही

  - राज किरणला दोन भाऊ आहेत. मोठ्या भावाचे नाव गोविंद मेहतानी आणि छोट्या भावाचे नाव अजीत मेहतानी आहे. ऋषी कपूर यांनी सांगितल्यानुसार, जेव्हा त्यांनी गोविंदजवळ राजचा नंबर मागितला, तेव्हा माझ्याजवळ त्याचा नंबर नाही, असे म्हणून गोविंद मेहतानीने ऋषी कपूर यांना टाळले होते. ऋषी कपूर यांचे म्हणणे होते की, "मला फोनवरुन राजसोबत बोलायचे आहे. मी स्वतः तेथे जाऊन त्याला घरी परत आणणार होतो.’ ऋषी कपूर यांनी या मुलाखतीत म्हटले होते, की ते राज किरणला मुंबईत परत आणू इच्छित होते आणि त्याला परत चित्रपटांमध्ये काम करताना बघायचे होते.

  दीप्ती नवल यांनीही केला होता राज किरण बेपत्ता असल्याचा उल्लेख
  - दीप्ती नवल यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून राज किरण बेपत्ता असल्याचे म्हटले होते. त्यांनी लिहिले होते, "चित्रपटसृष्टीतील माझ्या एका मित्राचा शोध मी घेतेय. त्याचे नाव राज किरण आहे. त्याचा काहीच पत्ता लागत नाहीये. अखेरचे माझ्या ऐकिवात आले होते की, तो न्यूयॉर्कमध्ये कॅब चालवतो. जर तुमच्याजवळ त्याची काही माहिती असल्यास मला नक्की कळवा." - दीप्ती नवल यांनी 1990 मध्ये आलेल्या ‘घर हो तो ऐसा’ सह चार चित्रपटांमध्ये राज किरणसोबत काम केले होते.

  महेश भट यांनी दिले होते काम देण्याचे वचन
  - राज किरण यांचे जवळचे मित्र असलेले महेश भट यांनी 2011 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा मी मुंबईतील एका हॉस्पिटमध्ये त्याला भेटलो होतो, तेव्हा त्याची तब्येत ठिक नव्हती. तो डिप्रेशनमध्ये होता. त्यावेळी महेश भट यांनी राजला चित्रपटांमध्ये काम देण्याचे वचन दिले होते. यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. त्यांच्या मते, जर इंडस्ट्रीत एखादी व्यक्ती पागल असल्याचे पसरते, तेव्हा त्याच्यासोबत काम करण्यास कुणीही तयार होत नाही. भट यांनी सांगितले होते की, किरण नंतर त्याच्या भावाला भेटायला यूएसला गेला आणि त्याच्यासोबत तिथे बिझनेस करु लागला होता.

  खरंच पत्नी आणि मुलीने सोडली साथ?

  - बॉलिवूडमध्ये राज किरण यांना ओळखणा-यांच्या मते, चित्रपटांमध्ये काम करणे कमी केल्यानंतर राज किरणची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. डिप्रेशनवर उपचार घेताघेता त्याच्याजवळचे सगळे पैसे संपले होते. राज किरणची तब्येत खालावत असताना त्याची पत्नी रुपा मेहतानी आणि मुलगी ऋषिकाने त्याची साथ सोडली होती.

  जेव्हा राजच्या कुटुंबियांनी ऋषी आणि दीप्तीला म्हटले - आमच्या मॅटरपासून लांब राहा...
  - एका एंटरटेन्मेंट वेबसाइटने 2016 मध्ये प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, राज किरणच्या कुटुंबीयांनी ऋषी कपूर आणि दीप्ती नवलला त्यांच्या घरातील प्रकरणापासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. कुटुंबीयांनी ऋषी कपूर यांचा दावा खोटा असल्याचे सांगत, राज अटलांटामध्ये नसून तो बेपत्ता असल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर ऋषीला राजच्या भावाचा फोन आला होता आणि त्याने ऋषी यांना याप्रकरणी शांत राहण्यास सांगितले होते. या कॉलविषयी ऋषी यांनी दीप्ती नवलला सांगितले होते. दोघांनी राज किरणच्या कुटुंबीयांच्या त्रासाला ओळखून गप्प राहणे पसंत केले.


  या चित्रपटांमध्ये झळकला राज किरण
  'प्यार का मंदिर', 'नाखुदा', 'अर्थ', 'राज तिलक', 'इल्जाम', 'घर हो तो ऐसा', ‘कर्ज', 'तेरी मेहरबानियां', किस्सा कुर्सी का', आणि 'वारिस' या चित्रपटांमध्ये राज किरणने काम केले होते. सुभाष घई आणि महेश भट या दिग्दर्शकांसोबत त्याने काम केले होते.

Trending