आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Rajkumar Rao Became A Girl For The Movie 'Ludo', He Shared The Photo, Users Said Rajkumar Rao!

'लूडो' चित्रपटासाठी राजकुमार बनला मुलगी, फोटो शेअर केला तर यूजर्स म्हणाले - राजकुमारी राव!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड डेस्क : राजकुमार रावने अपकमिंग फिल्म 'लूडो' मधून आपले दोन लुक शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो मुलीच्या गेटअपमध्ये आहे तर दुसरा लूक 80 च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती लूकने प्रेरित आहे. 'लूडो' 24 एप्रिलला रिलीज होत आहे. चित्रपटात अभिषेक बच्चन, तानी बासु, फातिमा सना शेख, रोहित सराफ, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रादेखील दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसु करत आहेत. 

यूजर्स म्हणाले, ओळखायलाच येत नाहीयेस... 
 
राजकुमारने जेव्हा फोटो शेअर केले, तेव्हा फॅन्स त्याचे कौतुक करत कमेंट करू लागले. काही लोक म्हणाले की, पहिल्या फोटोमध्ये राजकुमार रावचा लुक आलिया भट्ट किंवा कृती सेनन यांच्यासारखा वाटत आहे. राजकुमारच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर तो जान्हवी कपूरसोबत 'रूही अफजा' मध्ये आणि हंसल मेहताचा चित्रपट 'छलांग' मध्ये नुसरत भरूचासोबत दिसणार आहे.