आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

The Accidental Prime Minister : खऱ्या आयुष्यात चहा विकतात 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' चे अटल बिहारी वाजपेयी, शूटिंगच्या तीन दिवस अगोदर मिळाला रोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनुपम खेर स्टारर बायोपिक 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' शुक्रवारी (11 जानेवारी) रिलीज होत आहे. फिल्मची कहाणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या पॉलिटिकल जर्नीवर बेस्ड आहे, ज्यामध्ये अनुपम खेर हे लीड रोलमध्ये आहेत. फिल्ममध्ये डॉ. मनोहन सिंह यांच्या कार्यकाळातील सर्व नेत्यांना दाखवण्याचा प्रयत्न कला आहे आणि या लिस्टमध्ये माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचेही नाव सामील आहे. दिवंगत अटलजींचा रोल राम अवतार भारद्वाज हे करत आहेत. 

 

खऱ्या आयुष्यात चहा विकतात राम अवतार...
- रिपोर्ट्सनुसार, अटलजींच्या रोलसाठी फिल्म मेकर्सने सुमारे 50 लोकांचे ऑडिशन घेतले. पण त्यातील कुणीच शॉर्टलिस्ट झाले नाही. फिल्मची शूटिंग सुरु व्हायला केवळ तीन दिवस बाकी होते आणि. डायरेक्टर विजय रत्नाकर गुट्टे यांची काळजी वाढत चालली होती. अशातच त्यांची नजर एकदा चहा विकणाऱ्या राम अवतार भारद्वाज यांच्यावर पडली आणि त्यानंतर विजय यांनी राम अवतार यांना फिल्मसाठी कास्ट केले. 

 

राम अवतार म्हणले, 'मला राजकारणाचा अनुभव नाही... '
स्वतः राम अवतार यांनी एका बातचीतीमध्ये सांगितले, "मला राजकारणाचा अनुभव नाही. पण लोक म्हणतात की जेव्हा मी स्माइल करतो तेव्हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखा दिसतो". राम अवतार यांनी हेदेखील सांगितले की त्यांना स्वतःला अटलजी असे ऐकून घेण्याचीही सवय झाली होती. एवढेच नाही, जेव्हा ते शूटिंग करत होते. तेव्हा लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पोहोचायचे. फिल्ममध्ये राम अवतार तंतोतंत अटल बिहारी वाजपेयी त्यांच्यासारखेच दिसतात. 

बातम्या आणखी आहेत...