आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे रणवीर सिंह, असे आहे त्याचे कार कलेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणवीर सिंग लवकरच अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासोबत विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे. दीपिकाप्रमाणेच रणवीरसुद्धा आज बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. स्वबळावर तो कोट्यधीश झाला आहे. तब्बल 300 कोटींच्या संपत्तीचा तो मालक आहे. इतकेच नाही तर त्याच्याकडे एक मोठे कार कलेक्शनदेखील आहे.


मोठ्या बिझनेस फॅमिलीतून आहे रणवीर सिंग..
रणवीर सिंह एका मोठ्या बिझनेस फॅमिलीतून आहे. श्रीमंत कुटुंबातून असलेल्या रणवीरच्या वडिलांनी 'बँड बाजा बरात' या चित्रपटासाठी दहा लाख रुपये खर्च केले होते.  त्याच्या वडिलांचे नाव जगजीत सिंह भावनानी, आईचे नाव अंजु भावनानी आणि थोरल्या बहिणीचे नाव रितिका भावनानी आहे. रणवीरचे वडील बांद्राचे रिअल स्टेटचे व्यापारी आहेत. रणवीरला बालपणापासून अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते. पण कॉलेजच्या काळात त्याने अभिनयाचा विचार सोडून लिखाणाकडे लक्ष केंद्रित केले होते. त्याने इंडियाना यूनिव्हर्सिटी, ब्लूमिंगटन (यूएसए) येथून बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. रणवीर नावापुढे भावनानी हे आडनाव लावत नाही. कारण नाव खूप लांब होते, असे त्याचे म्हणणे आहे. फिल्म इंडस्ट्रीत या नावाने प्रसिद्धी मिळाली नसती, असे त्याचे मत होते.  


पुढे वाचा, रणवीर सिंहच्या आयुष्याशी निगडीत खास गोष्टी...   

बातम्या आणखी आहेत...