आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actor Rishi Kapoor, Eagerly Waiting To Return Home, Said 'My Battery Is Fully Charged To Face The Camera'

स्वदेशात परतण्यासाठी आतुर आहेत अभिनेते ऋषी कपूर, म्हणाले - 'कॅमेरा फेस करण्यासाठी माझी बॅटरी पूर्णपणे चार्ज आहे' 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऋषी कपूर कॅन्सरच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला पोहोचले होते. 10 महिने काम आणि देशापासून दूर राहिल्यानंतर अभिनेते आता पूर्णपणे ठीक होऊन भारतात परतणार आहेत. अशातच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या इंटरव्यूमध्ये ते म्हणाले, 'मी पूर्णपणे ठीक आहे आणि पुन्हा एकदा कॅमेरा फेस करण्यासाठी तयार आहे.'
 

45 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा घेतला एवढा मोठा ब्रेक - ऋषी... 
पुढे ऋषी कपूर यांनी सांगितले, 'मला माझ्या कामाची खूप आठवण येत आहे. मी मागच्या 45 वर्षांपासून काम करत आहे आणि आपल्या करिअरमध्ये मी एवढा मोठा ब्रेक कधीच घेतला नव्हता. आता परतण्याची वेळ आली आहे. या ब्रेकदरम्यान मी पहिल्यापेक्षा जास्त काम करण्यासाठी तयार झालो आहे. माझी बॅटरी आता चार्ज आहे आणि लवकरात लवकर मी कॅमेरा फेस करू इच्छितो. बस आता मी हीच अपेक्षा करत आहेर की, मी अभिनय करणे विसरलो नसेन. उपचाराच्यावेळी मालक रक्त चढवले जायचे. त्यावेळी मी माझ्या पत्नीला म्हणायचो. या नव्या रक्तामुळे मी अभिनय करणे विसरू नये. सध्या तरी मला हे माहित नाही की, फॅन्स मला पुन्हा स्वीकारतील की नाही.'  
 

खूप काळ सोशल मीडियापासून राहिलो दूर - ऋषी... 
अभिनेते म्हणाले, 'सुरुवातीच्या 5 महिन्यांमध्ये सोशल मीडियापासून दूर होतो. ट्वीट करू शकत नव्हतो. पण काही दिवसानंतर मला बरे वाटू लागले आणि मी सोशल मीडियाद्वारे फॅन्ससोबत पुन्हा एकदा संवाद साधू लागलो. आता पूर्णपणे ठीक आहे आणि कॅन्सरमुक्त आहे. माझ्याजवळ आज त्या व्यक्तींचे आभार मानण्यासाठी शब्द नाहीयेत, ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या आणि मला एवढे प्रेम दिले.'