आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actor Rishi Kapoor Targeted Finance Minister Over The Budget 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या बातम्यांमध्ये ऋषी यांनी अर्थमंत्र्यांवर साधला निशाणा - दूधवाल्यासोबत कशी घासघीस करत असेल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 1 फेब्रुवारीला अरमान जैनच्या मेहंदी सेरेमनीचे फंक्शन होते, पण यामध्ये ऋषी कपूर आणि नीतू दिसले नाही. बातम्यांनुसार, ते दिल्लीच्या रुग्णालयात भरती आहेत. ऋषी कपूर मागच्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये आपला चित्रपट 'शर्मा जी नमकीन' चे शूटिंग करत होते. मात्र यादरम्यान ते ट्विटरवर सक्रिय दिसले आणि त्यांनी बजेटवर आपली प्रतिक्रिया देत दोन ट्वीट केले. 
 

ऋषी कपूर यांनी बजेटवर दिली प्रतिक्रिया... 

हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या ऋषी कपूर यांनी दोन ट्वीटद्वारे बजेटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, "केवळ एक विचार येत आहे की, माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, बजेट बनवताना ट्रिलियन रुपये इकडे तिकडे करण्याबद्दल बोलत असतील. त्यांच्यासाठी अब्ज रुपये लहानशी किंमत असेल. एक गृहणी म्हणून त्या दुकानदार आणि दरवाज्यावरच्या दूधवाल्याशी कशा बोलत असतील ? त्या त्याच्याशी भाव करत असतील का की, आठ आणे कमी करा, सव्वा रुपया आणखी कमी करा. आश्चर्यकारक आहे ना? हेच आयुष्य आहे."  

रणबीर-आलिया पोहोचले... 

वडिलांच्या तब्येतीची बातमी ऐकून रणबीर कपूरदेखील आलिया भट्‌टसोबत दिल्लीला पोहोचला आहे. मात्र ऋषी यांच्या तब्येतीबद्दल ताजी माहिती अद्याप समोर आलेली नाही. ऋषी 2018 मध्ये कॅन्सरच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. यादरम्यान त्यांच्या पत्नी नीतू कपूर त्यांच्यासोबतच होत्या. ऋषी यांनी 10 सप्टेंबर 2019 ला याची माहिती ट्वीटद्वारे सर्वांना दिली होती की, ते 11 महिने आणि 11 दिवसानंतर घरी परततील.