आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूजर म्हणाले स्वस्त 'डीजे स्नेक', रितेश देशमुखने सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता रितेश देशमुख सध्या एका नवीन लूकमध्ये दिसतोय, ज्यामध्ये त्याचे केस खूपच लहान आणि पांढरे आहेत. हा नवा लूक बर्‍याच यूजर्सनी पसंत केला, पण त्याचा लूक पाहून एका सोशल मीडिया यूजरने त्याला स्वस्त डीजे स्नेक म्हणून संबोधले. त्यानंतर रितेशने त्याला योग्य उत्तर देत ट्रोल केले.


रितेशने त्या यूजरला उत्तर देताना लिहिले, "भाऊ, मी स्वस्त नाही... नाग पंचमीच्या दिवशी बुक कर मी विनामूल्य येईल." हे प्रत्युत्तर वाचल्यानंतर यूजरने त्याचे ट्विट डिलीट केले. या यूजरने रितेशची तुलना यासाठी केली, कारण रितेशचा हा लूक फ्रान्सच्या प्रसिद्ध डीजेशी मिळताजुळता दिसतोय.

स्वत: ला म्हटले होते 'बागी' 

अलीकडेच रितेशने इन्स्टाग्रामवर या नवीन लूकमधला स्वत: चा एक फोटो शेअर केला होता, त्याबरोबर त्याने 'अंदर का बागी' असे कॅप्शन लिहिले होते. तेव्हा करण जोहर आणि अभिषेक बच्चन यांनी त्याच्या या नवीन ट्रान्सफॉर्मेशनचे कौतुक केले होते. रितेशने नवीन लूकच्या प्रत्येक फोटोसह 'बागी 3' या आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन केले. 

नवीन लूकविषयी इतर यूजर्सनी मजेशीर कमेंट दिल्या.

बातम्या आणखी आहेत...