आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमित कर्ण
मुंबई : 'झीरो' चित्रपटामध्ये शाहरुख खान साडेचार फुटांच्या युवकाच्या भूमिकेत होता. आता शुक्रवारी रिलीज झालेल्या 'मरजावां'मध्ये रितेश देशमुखही तीन फुटांचा युवक विष्णु अण्णाच्या भूमिकेत आहे. या दोन्हीही चित्रपटांमध्ये अभिनेत्याला बटु दाखवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. एकीकडे 'झीरो'चे बजेट जास्त होते, तर शाहरुखला बटू दाखवण्यासाठी सेटवर आर्मी ट्रेंच बनवण्यात आले होते. दुसरीकडे 'मरजावां'मध्ये असे काहीही झालेले नाही. कारण या चित्रपटाचे बजेट 'झीरो' इतके जास्त नव्हते.
15 टक्के चित्रपटाची शूटिंग रितेशने गुडघ्यांवर केली
05 वेळा द्यावा लागला रितेशला शॉट
02 ते तीन मिनिटांचा असायचा शॉट
'झीरो'मध्ये वापरलेले तंत्र...
स्टेप 1 - सेटवर जागोजागी दीड फूट खड्डे करण्यात आले होते.
स्टेप 2 - खड्ड्यांमध्ये जाऊन शाहरुख शूट करत.
स्टेप 3 - त्याला याच खड्ड्यांत चालणे, बसणे, उठणे आणि इतकेच नाही तर डान्सही करावा लागत होता.
स्टेप 4 - शूटिंग पूर्ण झाल्यानंतर शाहरुखचे पात्र पोस्ट प्रोड्क्शनदरम्यान व्हीएफएक्सच्या मदतीने बटू दाखवण्यात आले.
'मरजावां'मध्ये हे तंत्र वापरले...
स्टेप 1 - सेटवर आर्मी ट्रेंच बनवण्यात आले नाहीत, पण रितेशला गुडघ्यांवर चालायला लावले. ही दृश्ये वेगवेगळ्या थरांमध्ये शूट केले.
स्टेप 4 -या वेगवेगळ्या अँगल्सद्वारे घेण्यात आलेल्या दृश्यांना विलिन करत व्हीएफएक्स तंत्राच्या मदतीने रितेशला बटू दाखवण्यात आले.
स्टेप 2 - हे पात्र दाखवण्यासाठी बॅकग्राउंड प्लेट वेगळी आणि फोअरग्राउंड प्लेट वेगळी ठेवली होती. नंतर त्या दोन्ही प्लेट्सना विलिन केले जात होते.
स्टेप 3 - नेहमी रितेशचा एक बॉडी डबलही हजर राहायचा. त्याची उंची कमी होती. निर्मात्यांनी त्याच्याकडून खास आयलाइनसाठी रेफरन्स पॉइंट घेतले.
प्रत्येक दृश्य पाच वेळा शूट करत होता रितेश...
रितेशच्या पात्राची उंची तीन फूट आहे. त्याला या उंचीचा दाखवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला. मात्र, मूळ रूपात व्हीएफएक्स तंत्राचाच आधार घेतला. आम्ही व्हीएफएक्समध्ये खूप काट-छाट केली. रितेशने गुडघ्यांवर संपूर्ण चित्रपटाचा १५ टक्के भाग शूट केला आहे. त्याला प्रत्येक दृश्य पाच-पाच वेळा शूट करावे लागत होते. हा एक-एक शॉट दोन ते तीन मिनिटांचा असायचा. मिलाप झवेरी, दिग्दर्शक
बॉडी डबल बनला श्रीधर...
चित्रपटामध्ये रितेशचा बॉडी डबल म्हणून अभिनेता श्रीधर वत्सरनेही निर्मात्यांची खूप मदत केली. तो संपूर्ण वेळ सेटवर हजर राहत होते. तथापि, त्याची उंची कमी असल्याने तो निर्मात्यांसाठी रेफरन्स पॉइंट बनला. त्याला पाहून अंदाज लावण्यात आला की, रितेशला किती उंचीपर्यंत दाखवायचे आहे. श्रीधर स्वत: एक मुरलेला अभिनेता आहे. 'धडक' शिवाय टीव्ही मालिका 'बालवीर'मध्येही त्याने काम केलेले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.