आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला ऑफर झाला होता \'धूम 4\', स्टारकास्ट बदलण्याच्या मागणीमुळे हातातून गेला होता सिनेमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: काही रिपोर्ट्सनुसार सलमान खानला 'धूम 4'साठी ऑफर मिळाली आहे. मागच्यावर्षी तो या चित्रपटाचे शूट करणार होता. परंतू नंतर यशराज फिल्मने यासाठी नकार दिला. वृत्तांनुसार मेकर्स हा चित्रपट दिवाळीला 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां'च्या रिलीजसोबत अनाउंस करतील. यामध्ये शाहरुख असण्याची शक्यता आहे. 


प्रोडक्शन हाउसला आवडल्या नाही सलमानच्या अटी 
वृत्तांनुसार सलमान खानला या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्याला हा चित्रपट करायचा होता. परंतू त्याच्या काही अटी होत्या. यामधील एक म्हणजे त्याला स्टारकास्टमध्ये बदल करायचे होते. प्रोडक्शन हाउसला स्टारकास्टमध्ये बदल करायचा नव्हता. त्यांना ओरिजनल स्टारकास्टसोबतच चित्रपट करायचा होता. यामुळे पुढे बोलणे होऊ शकले नाही. आता प्रोडक्शन हाउस कास्टला फायनल केल्यानंतर लवकरच ऑफिशियल अनाउंसमेंट करणार आहे. शाहरुख या चित्रपटाचा भाग असणार आहे की, नाही हे अजून ठरलेले नाही. 


'जिरो'नंतर रिकामा आहे शाहरुख 
शाहरुख 'झिरो'मध्ये व्यस्त आहे. यामध्ये तो एका ठेंगण्या व्यक्तीची भूमिका साकारतोय. हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. ट्रेड एक्सपर्टनुसार, 'झिरो' चित्रपट पुर्ण केल्यानंतर शाहरुकडे कोणताही चित्रपट नाही. 'सॅल्यूट'च्या नावावर अजूनही कोणतीही ऑफिशियल अनाउंसमेंट झालेली नाही. अशा वेळी तो या चित्रपटात काम करताना दिसू शकतो. यशराजसोबत काम करुनही शाहरुखला दोन वर्षे झाली आहेत. 

बातम्या आणखी आहेत...