आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Sameer Kochar Got Iconic Achievers Award, Said, "It Would Not Have Been Possible Without The Love Of The Audience."

अभिनेता समीर कोचरला मिळाला आयकॉनिक अचिव्हर्स अवार्ड, म्हणाला - 'प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय हे शक्य झाले नसते'  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता समीर कोचर एक प्रतिभावान व्यक्तिमत्त्व आहे जो अभिनयाच्या कोणत्याही रंगात पूर्णपणे विरघळतो. याच कारणास्तव समीरने डिजिटल इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. नेटफ्लिक्सच्या 'सॅक्रेड गेम्स' मालिकेचा एक महत्त्वपूर्ण भाग असल्याने त्याने आपली विलक्षण कारकीर्द सिद्ध केली आहे. समीर कोचरने 'जहर', 'जन्नत' आणि 'हाऊसफुल 3' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.

समीरला चित्रपट आणि डिजिटल कार्यक्रमातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. समीरला त्याच्या अभिनय आणि भूमिकांसाठी आयकॉनिक अचिव्हर्स अवार्ड मिळाला आहे. 'हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी माझ्या सर्व चाहत्यांचे आभारी आहे.' प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय हे शक्य झाले नसते. मी त्यांचे आभार मानू इच्छितो, ”समीरने हा पुरस्कार स्वीकारताना सांगितले.

यात काही शंका नाही की आगामी काळात समीर आपल्या चाहत्यांवरही अशाच प्रकारे प्रभाव पाडत राहील. व्यावसायिक आघाडीवर समीर कोचर दिग्दर्शक अनु मेननच्या वेबसीरीज 'फोर मोर शॉट्स प्लीज सीझन 2' मध्ये झळकणार आहे. या वेबसिरीजमध्ये समीर वकील म्हणून दिसणार आहे. वेबसीरिज मध्ये अभिनेत्री सयानी गुप्ता आणि कीर्ती कुल्हारी देखील दिसणार आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...