आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विक्की वेलिंगकर' चित्रपटात सोनाली कुलकर्णीसोबत झळकणार अभिनेता संग्राम समेळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सौरभ वर्मा दिग्दर्शित 'विक्की वेलिंगकर' या चित्रपटात अभिनेता संग्राम समेळ एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. संग्राम पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 'विक्की वेलिंगकर' या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. संग्राम आणि मी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. संग्राम यामध्ये विक्कीच्या मित्राची भूमिका साकारत आहे आणि तो एक हॅकर आहे. त्याची भूमिका ही मैत्रीसाठी जीवाला जीव लावणार असं हे पात्र आहे. मला संग्रामबरोबर काम करताना खूप मज्जा आली' असे सोनाली कुलकर्णी सांगते. अभिनेता संग्राम समेळ हा यापूर्वी 'उंडगा', 'ब्रेव्ह हार्ट', 'ललित 205' यांसारख्या मालिकांमधून तसेच 'एकच प्याला', 'कुसुम मनोहर लेले', 'वर खाली दोन पाय' यांसारख्या नवीन नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.