आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actor Sanjay Khan Celebrated His 78 Birthday With Bollywood Friends

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्येष्ठ अभिनेते संजय खान यांना बर्थडे विश करायला पोहोचला Ex जावई ऋतिक रोशन, शत्रुघ्न सिन्हापासून करीना कपूरच्या वडिलांपर्यंत 78 ह्या वाढदिवसाच्या पार्टीत झाले सामील : Photos

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते संजय खान यांनी आपला 78 वा बर्थडे गुरुवारी रात्री सेलिब्रेट केला. घरी ऑर्गनाइज केलेल्या या पार्टीमध्ये संजय यांनी वाइफ झरीन खान आणि मुलगा जाईद खानसोबत केक कापला. सासरे संजय खान यांना विश करण्यासाठी एक्स जावई ऋतिक रोशनही पार्टीमध्ये पोहोचला होता. मात्र, पार्टीमध्ये मुलगी सुजैन खान कुठेच दिसली नाही.  

 

बर्थडे सेलिब्रेशनमध्ये पोहोचले अनेक सेलेब्स...
- संजय खान यांच्या बर्थडे पार्टीमध्ये शत्रुघ्न सिन्हा, रणधीर कपूर, शबाना आजमी, अनु दीवान, अनु मलिक, डब्बू रतनानी, पत्नी किरण जुनैजासोबत रमेश सिप्पी, मधुर भंडारकर, अकबर खान, तलत अजीज, पूनम ढिल्लन यांसह अनेक सेलेब्स स्पॉट झाले. 

 

शूटिंगदरम्यान झाला होता अपघात.. 
1989 मध्ये जेव्हा 'टीपू सुल्तान'ची शूटिंग मैसूरच्या प्रीमियर स्टूडियोमध्ये सुरु होती. त्याचदरम्यान एक भयानक अपघातामुळे संपूर्ण टीम हादरली होती. 52 व्या एपिसोडचा सेट ललित महल पॅलेसमध्ये लावला गेला होता. मुंबईहुन आलेल्या 100 पेक्षा जास्त आर्टिस्ट येथे हजर होते. 4 फेब्रुवारी, 1989 ला रात्री टीपू सुल्तानच्या लग्नाचा सीन चित्रित होत होता. तेव्हाच फटाक्यांमुळे सेटला आग लागली, ज्यामध्ये 42 लोकांचा मृत्यू झाला. संजय खानसहित 25 लोक त्या अपघाताचे शिकार झाले. 

 

65 टक्के जळाले होते संजय खान... 
डॉक्टर्सनुसार, या अपघातात संजय खान 65 टक्के जळाले होते. ते 13 महिने हॉस्पिटलमध्ये अडमिट होते. आणि त्यादरम्यान त्यांच्या 73 सर्जरी झाल्या.  एवढ्या सर्जरीनंतरही त्यांच्या स्किनचा कलर आजही व्हाईट आहे. 


पुढील स्लाइड्सवर बघा संजय खान यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे आणखी काही फोटोज...