मुंबई / वृक्ष लागवडीवरून अभिनेते सयाजी शिंदेंची सरकारवर टीका; म्हणाले - राज्यातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक

वृक्ष लागवडीद्वारे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप 
 

दिव्य मराठी

Aug 18,2019 03:08:00 PM IST

मुंबई - राज्यातील वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाबाबत अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारवर टीका केली. वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम केवळ नाटक आहे. 5 कोटींचे वृक्ष लागवड हे एकप्रकारचे थोतांड असून वृक्ष लागवडीतून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याचे ते म्हणाले. दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्ष लागवड करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मंत्र्यांनाच वृक्षांच्या जातींची माहिती नाही
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केल्यानंतर राज्यातील अनेक भागांत वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र आता सयाजी शिंदे सरकारच्या या निर्धारावर टीका केली आहे. दरम्यान दरवर्षी लावण्यात आलेल्या झाडांचे, त्यांना जगवण्यासाठी आलेल्या खर्चाचा हिशोब देण्याची मागणी सयाजी शिंदे यांनी केली. मंत्र्यांनाच वृक्षांच्या जातींची माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले.

X