Home | News | Actor Shakti Kapoor Shares Birthday Memories Attached To Daughter Shraddha Kapoor

B'day: बालपणी श्रद्धाने दिले असे सरप्राइज की शक्ती कपूरच्या डोळ्यांत तरळले अश्रू!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2018, 12:28 PM IST

हिंदी सिनेसृष्टीत आपल्या विनोदी आणि व्हिलनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण

 • Actor Shakti Kapoor Shares Birthday Memories Attached To Daughter Shraddha Kapoor

  मुंबईः हिंदी सिनेसृष्टीत आपल्या विनोदी आणि व्हिलनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. 3 सप्टेंबर 1958 रोजी जन्मलेल्या शक्ती कपूर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये 750 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी divyamarathi.com सोबत आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक खास गोष्टी शेअर 2016 मध्ये शेअर केल्या होत्या, त्याच आठवणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

  बालपणीच्या काही खास आठवणी शेअर करा?
  - माझी आई वाढदिवसाच्या निमित्ताने कधी क्रिकेटची बॅट द्यायची तर कधी सोन्याची साखळी. मोठे झाल्यानंतर मला वेगवेगळे लॉकेट खूप आवडू लागले. तर आई माझ्यासाठी लॉकेट आणायची. शंकराचे लॉकेट आईने मला दिले होते. तर वडील नवीन कपडे घेऊन द्यायचे.

  एखादे स्पेशल गिफ्ट आठवतंय का?
  - मला आठवतंय एका चेन्नईत मी शूटिंग करत होतो आणि मी मुंबईत का नाही, म्हणून माझी पत्नी रागावली होती. त्यावेळी श्रद्धा 6 वर्षांची असेल. मी 3 सप्टेंबरच्या सकाळी सकाळी दिग्दर्शक रघुवेंद्र साहेबांची परवानगी घेऊन मुंबईची फ्लाइट पकडली आणि घरी पोहोचलो तर पत्नी घरी नव्हती. श्रद्धा आपल्या खोलीत बसली होती. तिने मला बघून मला बर्थडे विश केले आणि आई घरी नसल्याचे सांगितले. आई रात्री येणार म्हणून तिने मला सांगितले. मला वाटलं, माझं सरप्राइज बेकार झालं. मग श्रद्धा माझा हात पकडून मला हॉलमध्ये घेऊन आली. पिआनोवर हॅपी बर्थडे गाणे वाजवले आणि गायलेसुद्धा. तिचे गाणे ऐकून माझ्या डोळ्यांत अश्रू तरळले. तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही.

  श्रद्धा बालपणापासूनच पिआनो वाजवते का?
  होय. श्रद्धा खूप छान पिआनो वाजवते. आगामी 'रॉन ऑन 2' या सिनेमात ती पिआनो वाजवणार आहे. सोबतच ती गातेसुद्धाय मात्र तिने यासाठी विशेष काही ट्रेनिंग घेतलेले नाही.


  पुर्वी मुंबईत कशा पार्ट्या होत असे?
  - जेव्हा मुले लहान होती, तेव्हा मस्त पार्टी व्हायची. मात्र मुले मोठे झाल्यानंतर पार्टी ऐवजी आम्ही लंच पार्टी ठेवतो. विथ फॅमिली आम्ही लंचला जातो. यावेळी माझी मेहुणी पद्मिनी कोल्हापुरे, तिचे पती, मुले सगळे सोबत असतात. अगदी कौटुंबिक वातावरण असतं. घरी पूजासुद्धा असते. माझी पत्नी दान गरीबांना दान करते. आम्ही अतिशय साधी माणसं आहोत. वाढदिवस माझा असतो आणि खर्चसुद्धा माझाच होतो. (हसून)

  तुम्ही खूप सिनेमे केले आहेत, त्याविषयी सांगा?
  मी प्रत्येक भाषेतील म्हणजे तामिळ, तेलुगु, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, बंगाली, हिंदी, ओडिया, पंजाबीमध्ये 750 हून अधिक सिनेमे केले आहेत. मी फक्त काम करतो आणि चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करतो. आयुष्याची भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगतो.

  'आऊ लोलिता' हा तुमचा डायलॉग खूप फेमस झाला होता?
  हे कसे झाले, ते मला कळलेच नाही...कालसुद्धा मी एक शो करत होतो, तेव्हा लोक जोरजोराने 'आऊ लोलिता' म्हणून ओरडत होते. हा 'तोहफा' फिल्ममधील डायलॉग होता, जो मी श्रीदेवीला म्हणतो. हा डायलॉग एवढा गाजेल, हे मला त्यावेळी मुळीच वाटले नव्हते. तीस वर्षांहून अधिकचा काळ लोटला असूनदेखील लोकांना आजही 'आऊ' हा शब्द आठवतोय.

Trending