Home | Marathi Katta | Actor Subodh Bhave Birthday, Love and acting Struggle Facts

B'day: एकेकाळी अॅक्टिंग येत नसल्याने नाटकातून काढले, शाळेपासूनच्या मैत्रिणीसोबतच केला विवाह; अशी आहे सुबोध भावेची Life

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:53 PM IST

सुबोध केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही सुबोध तेवढाच रोमँटिक आहे.

 • Actor Subodh Bhave Birthday, Love and acting Struggle Facts

  मुंबई - नुकतेच प्रदर्शित झालेल्या डॉ. काशीनाथ घाणेकर चित्रपटात आपल्या अभिनयामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असलेला सुबोध भावे आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुबोधचे चित्रपटक्षेत्रात मोठे नाव आहे. यापूर्वी लोकमान्य, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांतून त्याच्या अभिनयकौशल्याने सर्वांनीच त्याला सलाम ठोकला. पण, केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही सुबोध तेवढाच रोमँटिक आहे. त्याची लव्हस्टोरी ऐकल्यानंतर तुम्हीही सुबोधच्या प्रेमातच पडाल.


  नाट्य कला मंदीरात झाली होती सुबोध-मंजिरीची ओळख...
  नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये असताना सुबोध आणि मंजिरी यांची ओळख झाली. मंजिरी त्यावेळी आठवीत तर सुबोध तेव्हा दहावीत होता. त्यावेळी अभिनय येत नसल्याकारणाने सुबोधला नाटकातून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे तो बॅकस्टेज काम करत होता. त्यावेळी मंजिरी नाटकात काम करायची आणि मंजिरीला पाहताक्षणीच सुबोध तिच्या प्रेमात पडला.


  असे केले होते प्रपोज...
  शाळेत असताना ऑटोग्राफ बुक मिळायच्या त्यावर सुबोधने मंजिरीला, शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यु, व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहून दिले. त्यावर सुबोधने उत्तर विचारल्यावर मंजिरीने जर मी बालगंधर्वच्या पुलावर आले तर हो नाहीतर नाही असे सांगितले. त्यानंतर मंजिरी त्या पुलावर गेली आणि सुबोधला त्याच्या प्रेमाचे उत्तर मिळाले.


  चोरुन-लपून अशी व्हायची भेट..
  सुबोधने सांगितले की, मंजिरी आणि त्याची शाळा वेगळी असल्याकारणाने त्यांची भेट फार कमीवेळेस होत असे. मंजिरीची शाळा सुटण्याच्या वेळी सुबोध एका नाक्यावर रोज जाऊन उभे राहायचा. त्यावेळी दोघांची नजरानजर होऊन केवळ एक स्मितहास्य एवढेच काय त्यांची ओळख होती. हळूहळू दोघांत मैत्री झाली. त्यानंतर 12वीला असताना मंजिरी कॅनडाला शिफ्ट झाली आणि तिची कमी भरून काढण्यासाठी सुबोधने स्वतःला नाटकात गुंतवून घेतले. इतकेच नव्हे तर त्यांनी आईवडिलांनाही त्यांच्या या प्रेमाची कल्पना दिली पण तुम्ही अजून लहान आहात, अगोदर शिक्षण पूर्ण करा असा सल्ला घरच्यांनी दिला.


  एकमेकांना पत्र लिहायचे मंजिरी-सुबोध...
  मंजिरी कॅनडाला गेल्यावर दोघेही एकमेकांना पत्रे लिहायचे. एक पत्र कॅनडाला पोहोचल्यावर त्या पत्राचे उत्तर येण्यासाठी 21 दिवसांचा अवधी लागायचा. अनेकदा तर सुबोधने लिहलेल्या पत्रांवरीलस पत्ता पावसाच्या पाण्याने पुसला गेल्याने ती पुन्हा त्यालाच भेटली होती. अशाप्रकारे पाच वर्षे त्यांनी एकमेकांना न पाहता काढली.


  रात्र जागून सुबोधने कॅनडाला पाहिलेल्या मॅचेस...
  सुबोधला मंजिरीची इतकी ओढ होती की कॅनडाला कोणतीही भारताची क्रिकेट मॅच असली तर सुबोध रात्ररात्र जागून मंजिरी दिसेल या आशेने ती मॅच पाहत असे. कोणतेही विमान उडताना पाहिले की मंजिरीच भारतात आली की काय असेच त्याला वाटत असे.


  भारतात परतल्यानंतर सुबोध-मंजिरीने केली एकाच ठिकाणी नोकरी...
  भारतात परतलेल्या मंजिरीने सुबोधसोबत पुण्यातील एका कंपनीत सोबत नोकरी केली. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. साखरपुडा झाला तेव्हा सुबोध नोकरी करत होता पण लग्न झाल्यानंतर नोकरीत मन रमेनासे झाले आणि सुबोधने नोकरी सोडून अभिनयाला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला. मंजिरी आणि सुबोध यांच्या लग्नाला अठरा वर्षे होत आहेत. त्यांच्या संसाररुपी वेलीवर मल्हार आणि कान्हा ही दोन चिमुकली मुले आहेत.

 • Actor Subodh Bhave Birthday, Love and acting Struggle Facts
 • Actor Subodh Bhave Birthday, Love and acting Struggle Facts
 • Actor Subodh Bhave Birthday, Love and acting Struggle Facts
 • Actor Subodh Bhave Birthday, Love and acting Struggle Facts
 • Actor Subodh Bhave Birthday, Love and acting Struggle Facts
 • Actor Subodh Bhave Birthday, Love and acting Struggle Facts

Trending