आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Sumit Vyas Is Enjoying A Trip With His Wife For The First Time After Marriage

लग्नानंतर पहिल्यांदा पत्नीसोबत फिरायला निघाला अभिनेता सुमित व्यास, कामासोबतच एन्जॉय करत आहे पर्सनल ट्रिप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'वीरे दी वेडिंग' मध्ये करिना कपूरचा सहकलाकार असलेला सुमित व्यास सध्या तायवानमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. लग्नानंतरची ही पहिली वेळ आहे, जेव्हा तो पत्नी एकता कौलसोबत सुट्ट्या एन्जॉय करायला निघाला आहे. कपलने व्हॅकेशनचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये कुठे ते रोमँटिक पोज देत आहेत तर कुठे ते सायकलिंग करताना दिसत आहेत. 

 

सुमितने शूटिंगमधून काढला वेळ... 
सुमित व्यास वेब सीरीज REJCTX च्या शूटिंगसाठी थायलँडमध्ये होते. एकता मुंबईहून थायलँडला पोहोचली आणि मग कपल तेथून तायवानसाठी रवाना झाले. रिपोर्ट्सनुसार, कपलने एका आठवड्याचे व्हॅकेशन प्लॅन केले आहे.  ​​​​​​​

 

सुमितने कामाला बनवले पर्सनल ट्रिप... 
एका इंटरव्यूयामध्ये सुमितने सांगितले होते, "मी कामासाठी तायवानला जात आहे. त्यामुळे मी याला एकतासोबत पर्सनल ट्रिपमध्ये रूपांतरित केले. लग्नानंतर आमची एकत्र एकही ट्रिप झाली नव्हती. आम्हाला तायवान आवडते. हे पाहण्यासारखे आहे. मी एकताला सर्वकाही प्लॅन करायला सांगितले, कारण ती खरंच खूप चांगली रिसर्चर आहे."

 

मागच्या वर्षी झाले होते सुमित-एकताचे लग्न... 
सुमित आणि एकताने मागच्यावर्षी सप्टेंबरमध्ये लग्न केले होते. त्यानंतरपासूनच सुमित खूप व्यस्त आहे. अभिनयाव्यतिरिक्त तो दुसरे शोज आणि प्लेज लिहिण्याचे कामही करत आहे. एकता कौल टीव्ही अभिनेत्री आहे. तिने 'रब से सोणा इश्क', 'बड़े अच्छे लगते हैं' आणि 'एक रिश्ता ऐसा भी' यांसारख्या सीरियल्समध्ये काम केले आहे.